R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलंय, मला बोलू द्यायचं की नाही हे त्यांनी ठरवावं...

मी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलंय, मला बोलू द्यायचं की नाही हे त्यांनी ठरवावं – खासदार संभाजीराजे

 

नवी दिल्ली | राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्धा तापत असताना मराठा आरक्षणासंबंधी १२७ व्या घटना दुरुस्तीमध्ये सुधारणा करणारे विधेयक चर्चेनंतर संसदेत बहुमताने मंजूर करण्यात आले आहे. लोकसभेत विधेयक पारित झाल्यानंतर आज हे विधेयक राज्यसभेत मांडलं जाणार आहे. त्याआधी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून खासदार संभाजाराजे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आपलं म्हणणं मांडलं आहे.

आरक्षणाच्या बाबतीत राज्यांना काय अधिकार असतो?, तर देण्यात येणारं आरक्षण हे अपवादात्मक स्थितीत आहे की नाही, हे राज्य सरकार ठरवू शकतं. पण जर घटनेत बदल करायचे असतील तर ते केंद्राला करता येतात, राज्यांना यात बदल करता येत नाही. त्यामुळे ५० टक्के आरक्षणाची मर्यादा पार करायची असेल तर, ती राज्याच्या शिफारसीवर केंद्राला पार करता येतं, असं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे.

आज राज्यसभेत बोलण्यासंदर्भात मी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलं आहे. आता त्यांनी ठरवायचं मला बोलू द्यायचं की नाही. कारण मी स्पष्ट बोलतो, माझ्या बोलण्याचा जर त्यांना त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. मी माझी भूमिका स्पष्टच मांडली आहे. मला विश्वास आहे की, ते मला बोलू देतील, असंही संभाजीराजे म्हणाले आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments