R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या चंद्रकांत पाटलांना नाही पण गृहमंत्री अमित शहा हर्षवर्धन आणि विखे पाटील यांना...

चंद्रकांत पाटलांना नाही पण गृहमंत्री अमित शहा हर्षवर्धन आणि विखे पाटील यांना भेटले

 

नवी दिल्ली | महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी गृहमंत्री अमित शहा यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी, त्यांनी शहा यांच्याशी सहकार तसेच इतर विविध विषयांवरती सविस्तर चर्चा केली. तसेच, या दोन्ही नेत्यांनी देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांचा सत्कार केला.

या भेटीत राजकीय पुनर्वसन करण्याबाबतही दोन्ही नेत्यांनी शहा यांच्याशी चर्चा केली असण्याची शक्यता सांगितली जात आहे. कारण दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशाला आता दोन-अडीच वर्षे उलटून गेली आहेत. पण अद्यापही भाजपत त्यांना शोभेल असं कोणतंही पद किंवा जबाबदारी दिली गेली नाही, ही बाब लक्षात घेतली तर, या पार्श्वभूमीवर देखील या दिग्गज नेत्यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान, हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसच्या काळात, राज्यातील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य नेते मानले जात होते. त्यामुळे या दोघांचा सहकार क्षेत्रातील अभ्यास व अनुभवाचा उपयोग भाजपकडून केला जाईल अशी चर्चा सुरू आहे. हर्षवर्धन पाटील हे राज्याचे सलग ७ वर्षांपेक्षाही अधिक काळ सहकार मंत्री होते. दोन्ही नेत्यांचा राज्यातील राजकारणावर आणि सहकार क्षेत्रावर मोठा प्रभाव आहे.

मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह राज्यातील काही नेत्यांनी चार दिवस दिल्लीत तळ ठोकूनही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट होऊ शकली नाही. मात्र, भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि हर्षवर्धन पाटील यांना मात्र मंगळवारीच शहा यांची भेट मिळाली. या भेटीत सहकार क्षेत्राविषयी चर्चा झाली. नव्या सहकार मंत्रालयामार्फत काय काय करता येऊ शकते यावर भेटीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. भेट न मिळाल्याने चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह दिल्लीला गेलेले नेते कालच मुंबईत परतले असताना दिल्लीत मात्र विखेंची शहा यांच्याशी भेट झाल्याने पाटील यांना भेट नाकारली गेल्याच्या चर्चेला पुन्हा बळ मिळाले आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments