R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति विरोधकांच्या गोंधळानंतर सभापती व्यंकय्या नायडूंना अश्रू अनावर

विरोधकांच्या गोंधळानंतर सभापती व्यंकय्या नायडूंना अश्रू अनावर

 

नवी दिल्ली | सध्या फोन टॅपिंग प्रकरण आणि शेतकरी कृषी कायद्याविरोधात विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच विरोधकांनी तीन कृषी कायद्यांचा विरोध करताना राज्यसभेत मंगळवारी जोरदार गदारोळ घातला. काही खासदारांनी तर चक्क बाकावर उभे राहत विरोध दर्शवला. या संपूर्ण घटनेनंतर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू हे आज सभागृहात भावूक झाल्याचं पहायला मिळालं.

आज सभागृहाचे कामकाज सुरू होताच राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी मंगळवारी झालेल्या गोंधळावर भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी उभे राहून या गोंधळावर दु:ख व्यक्त केलं. इतकेच नाही तर त्यांनी म्हटलं, विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे मला रात्रभर झोप लागली नाही.

भावूक झालेल्या व्यंकय्या नायडूंनी म्हंटलं आहे की “काही सदस्यांनी सभागृहाचे अपवित्र चित्रीकरण केले आणि सोशल मीडियात फोटो पोस्ट केले ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सभागृहाची प्रतिष्ठा कशी भंग होते हे त्यांनी जनतेला दाखवून दिले. हा काही सदस्यांमध्ये स्पर्धात्मक आणि आक्रमक म्हणून स्वत:ला सादर करण्याच्या स्पर्धेचा परिणाम आहे असे त्यांनी म्हंटल होत

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

मेळावे घेण्यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..? – शालिनीताई ठाकरे यांचा टोला !

  राज्य महिला आयोगाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अध्यक्षपदाचा चाकणकरांनी गुरुवारी पदभार स्वीकारला होता. त्यावर मनसे नेत्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments