R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राहुल गांधींच्या ट्विटनं आमच्या धोरनांचं उल्लंघनल ट्विटरन राहुल गांधी प्रकरणात दिल स्पष्टीकरण

राहुल गांधींच्या ट्विटनं आमच्या धोरनांचं उल्लंघनल ट्विटरन राहुल गांधी प्रकरणात दिल स्पष्टीकरण

 

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे ट्विट त्वटरने डिलीट केले होते. यावरून मोठा गदारोळ निर्माण झाला होता. यावर आता ट्विटरकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. ट्विटरने दिल्ली उच्च न्यायालयात म्हटले आहे, की राहुल गांधींच्या ट्विटने आमच्या धोरणाचे उल्लंघन केले आहे. राहुल गांधींवर दिल्लीतील अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची ओळख सोशल मीडियावर उघड केल्याचा आरोप आहे.

ट्विटरने बुधवारी उच्च न्यायालय सांगितले, की दिल्लीच्या कँट भागात अत्याचार झालेल्या ९ वर्षांच्या मुलीच्या आई वडिलांचा फोटो शेअर करणारे काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे ट्विट हटविण्यात आले आहे. तसेच नियमांकडे दुर्लक्ष केल्याने गांधी यांचे टि्वटर अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे. सरन्यायाधीश डीएन पटेल आणि न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या खंडपीठा समोर एका जनहित याचिकेच्या उत्तरात ट्विटरने ही माहिती दिली आहे.

संबंधित पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख ट्विटरच्या माध्यमाने उघड केल्याबद्दल, राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग आणि पोलिसांना राहुल गांधी यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी दिल्ली उच्च न्यायालयात करण्यात आली आहे. राहुल गांधी हे दिल्लीतील नांगल गावात अत्याचार झालेल्या ९ वर्षांच्या दलित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी गेले होते आणि त्यांनी त्यावेळचा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments