R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश कोरोना लसीकरण पुर्ण करून, शाळा सुरू करा - आमदार चंद्रकांत जाधव

कोरोना लसीकरण पुर्ण करून, शाळा सुरू करा – आमदार चंद्रकांत जाधव

 

राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण पुर्ण करूनच, शाळा सुरू कराव्यात अशी मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. विद्यार्थ्यांच्या कोरोना लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवावी अशी सूचना आमदार जाधव यांनी केली आहे.
आमदार जाधव यांनी आज मुंबईत शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनातील माहिती अशी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी झाल्याने, येत्या १७ ऑगस्ट २०२१ पासून राज्यातील ग्रामीण भागात इयत्ता ५ वी ते ७ वी पर्यंत आणि शहरी भागात ८ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने परवानगी दिली आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी निवेदनात केलेली आहे.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग कमी झाला असला तरी, तिसऱ्या लाटेचे संकेत वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केले आहेत. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे आरोग्य विभागाला सांगीतले आहे. यांमुळे तिसरी लाट थोपवण्याबरोबर लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. अशा परिस्थितीमध्ये शाळा सुरू झाल्यास विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने विशेष मोहीम राबवावी. राज्यातील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरच राज्यातील सर्व शाळा सुरू कराव्यात.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

…पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप !

  राज्यात आघाडीसह सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप लगावले होते.तसेच त्यांच्या आरोपणानंतर अनेकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी...

जनतेने नापास केले तरी तुम्ही सत्तेत, फडणीवसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

  मुंबई | मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांनी विरोधी पक्षावर तसेच सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. याला...

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न, अनेक मान्यवरांनी लावली उपस्थितीत

  कोल्हापुर | कोल्हापुरातील करवीरनगरीत पारंपरिक विजयादशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments