R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति राज्यसभेतील गोंधळावरुन शरद पवारांनी व्यक्त केला संताप म्हणाले की, 55 वर्षांच्या संसदीय...

राज्यसभेतील गोंधळावरुन शरद पवारांनी व्यक्त केला संताप म्हणाले की, 55 वर्षांच्या संसदीय राजकारणात असे कधी पाहिलेले नाही

 

नवी दिल्ली | संसदेचे पावसाळी अधिवेशन बुधवारी दोन दिवसांपूर्वीच गुंडाळण्यात आले. फोन टॅपिंग प्रकरण आणि वादग्रस्त कृषी कायद्यांवरून काँग्रेससह सर्व विरोधकांनी आक्रमक पवित्रा स्वीकारल्याने अधिवेशनातील बहुतांश गदारोळामुळे क्कामकाज होऊ शकले नाही.

संसदेचे अधिवेशन १९ जुलैला सुरू झाले. ते १३ ऑगस्टला समाप्त होणार होते. मात्र, ते निर्धारित वेळापत्रकाच्या आधीच आटोपते घेण्यात आले. अधिवेशन काळात लोकसभेच्या १७ बैठका झाल्या. त्यामध्ये गदारोळामुळे त्या सभागृहाचे कामकाज केवळ २१ तास चालले. राज्यसभेत १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान जोरदार गोंधळ झाला. याचवेळी वेलमध्ये उतरुन आंदोलन करणाऱ्या महिला खासदारांनी निषेध व्यक्त करत कागद फाडून भिरकावले. यादरम्यान मार्शल्सकडून गैरवर्तन केल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. तर सरकारने विरोधकांनी सभागृहात उपस्थित मार्शल्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप केला आहे.

याच मुद्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’मी माझ्या ५५ वर्षांच्या संसदीय करिअरमध्ये असं कधीचं पाहिलं नाही. राज्यसभेत ज्याप्रकारे महिला खासदारांवर हल्ला करण्यात आला. या पूर्वी मी कधीच असं बघितलं नाही. सभागृहात हे योग्य झाले नाही. हे एकप्रकारे वेदनादायी अन् लोकशाहीवर हल्ला करणे आहे. असं शरद पवार म्हणाले आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments