R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति भाजपचे ढोंग उघडे पडले, खासदार अरविंद सावंत यांची घणाघाती टीका

भाजपचे ढोंग उघडे पडले, खासदार अरविंद सावंत यांची घणाघाती टीका

 

घटनादुरुस्ती विधेयकामुळे भाजपाचा मराठाविरोधी चेहरा उघडा पडला असून आरक्षणाचा अधिकार राज्यांनाच आहे, असे तुणतुणे राज्यातले भाजपाचे नेते वाजवत होते. त्याचा पर्दाफाश लोकसभेत झाला आहे. आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक करण्याची घटनादुरुस्ती शिवसेनेने सुचविली होती. मात्र त्याला भाजपा खासदारांनी विरोध केला. त्यामुळे भाजपाचे ढोंग उघडे पडले आहे, अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

लोकसभेत काल १२७ व्या घटनादुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यावेळी झालेल्या घडामोडींबाबत शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार विनायक राऊत व खासदार अरविंद सावंत यांनी बुधवारी मीडियाशी संवाद साधला. खासदार गजानन कीर्तिकर यावेळी उपस्थित होते.

शिवसेनेने घटनादुरुस्ती विधेयकात दुरुस्ती सुचवून आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांहून अधिक करावी, अशी मागणी केली होती. मात्र या दुरुस्तीच्या बाजूने ७१ तर विरोधात 302 मते पडली. मराठा आरक्षणाच्या बाजुने गळा काढणाऱया भाजप खासदारांनी या दुरुस्तीविरोधात मतदान केले. त्यामुळे भाजपचे ढोंग उघडे पडले आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

महाविकास आघाडी सरकारच्या पापाचा घडा भरला आहे

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्षाकडून सतत सरकार पडण्याच्या वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात येत आहे. त्यातच आता पुन्हा एकदा भाजपा नेते आणि...

देश हुकुमशाहीच्या उंबरठयावर, प्रकाश आंबेडकर यांचा उद्धव ठाकरे यांच्या विधानाला पाठिंबा

  अकोला | केंद्राकडून राज्यांच्या अधिकारांवर अतिक्रमण होत असल्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात बोलून दाखविले होते आता त्यांच्या या भूमिकेचे वंचित बहुजन आघाडीचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments