R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति खासदार छत्रपती संभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले,

खासदार छत्रपती संभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले,

 

नवी दिल्ली | एखाद्या समाजास आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार देणारे विधेयक दोन्ही सभागृहात मंजुर झाले आहे. मंगळवारी लोकसभेत आणि बुधवारी राज्यसभेत विधेयक पारित झाले आहे. या विधेयकावर दोन्ही सभागृहात जोरदार चर्चा झाली. विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहेत. बुधवारी १२७ व्या घटनादुरूस्ती विधेयकावर चर्चा चालू होती. मराठा आरक्षणाचा मुद्दा प्रामुख्यानं उपस्थित करणारे खासदार छत्रपती संभाजीराजे यांना संसदेत बोलण्याची परवानगी दिली नव्हती. त्यानंतर संजय राऊत राज्यसभेत बोलण्यासाठी उभा राहिले आणि त्यांनी सभापतींकडे संभाजीराजे यांना बोलू देण्याची मागणी केली.

संजय राऊतांच्या मागणीनंतर शिवसेना खासदारांनीही त्यांना बोलू देण्याचा आग्रह धरला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचे ते वंशज आहे. ज्यांनी देशात पहिल्यांदा आरक्षण लागू केलं. त्यांना बोलू दिलं जात नाही. त्यांना २ मिनिटं तरी बोलू द्यावं, अशी मागणी संजय राऊतांनी केली. त्यानंतर सभापतींनी संभाजीराजे यांना संसदेत आपला मुद्दा मांडू दिला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

मेळावे घेण्यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..? – शालिनीताई ठाकरे यांचा टोला !

  राज्य महिला आयोगाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अध्यक्षपदाचा चाकणकरांनी गुरुवारी पदभार स्वीकारला होता. त्यावर मनसे नेत्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments