R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर तरी आपला फोटो आहे, नरेंद्र मोदींना टोला...

आपण भाग्यवान म्हणून ड्रायव्हिंग लायसन्सवर तरी आपला फोटो आहे, नरेंद्र मोदींना टोला !

 

नवी दिल्ली | सध्या विविध मुद्दयावरून विरोधक मोदी सरकारवर घणाघाती टीका करताना दिसून आले आहेत. त्यात कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोच्या मुद्द्याची भर पडली आहे. कोरोना लसीकरण पत्रावर पंतप्रधान मोदींचा फोटो असण्यावरून राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला होता.

मात्र यावरून केंद्र सरकारने दिलेल्या उत्तरावरून पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की गाडी चालवण्याच्या परवान्यावर तरी आपला फोटो आहे, असा टोला लगावण्यात आला आहे. कोरोना लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्याची गरज काय, असा सवाल अनेकांकडून केला जात आहे. अनेक राज्यांनी तर त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा फोटो हा त्या प्रमाणपत्रावर असावा, अशी मागणी केली आहे.

केंद्र सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींचा फोटो आणि त्या सोबतचा संदेश हा या प्रमामाणपत्रावर छापण्यामागे जनजागृती करण्याचा हेतू आहे. यावरून राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांच्या कन्या दीक्षा राऊत यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे की, आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सवर स्वतःचाच फोटो आहे. मास्क नसलेल्या माणसाचा फोटो शक्यतो कोरोनावर जागरूकता करू शकत नाही!, असे ट्विट दीक्षा राऊत यांनी केले आहे.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

Recent Comments