R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अनिल देशमुख यांच्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाकडे ईडीने वळवला मोर्चा |

अनिल देशमुख यांच्या कंपन्यांनी घेतलेल्या कर्जाकडे ईडीने वळवला मोर्चा |

 

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी हप्ता वसुलीच्या आरोपांवरून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच त्यांच्यावर कारवाईसाठी ईडीने कंबर कसली होती. तसेच त्यांच्या नागपूर आणि मुंबई येथील कार्यालयावर ईडीने छापा टाकत चौकशी सुरु केली होती. त्यातच आता ईडीने देशमुखांच्या कंपन्यांनी विविध बँकांतून घेतलेल्या कर्जाची तपासणी सुरू करत आहे.

देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या नावे असलेल्या विविध कंपन्यांसाठी ही कर्जे उचलण्यात आली आहेत. मात्र, त्यापैकी बहुतांश कंपन्या या केवळ कागदावरच अस्तित्वात असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांनी अनियमितपणे या शेल कंपन्यांसाठी कर्ज दिल्याचा संशय आहे. त्यामुळे त्याबाबत प्राधान्याने माहिती घेण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

आतापर्यंतच्या ईडीच्या तपासात देशमुख यांनी खासगी बँकांकडून अनेक असुरक्षित कर्जे घेतल्याचे आढळले आहे. ती मंजूर करताना नियमांचे उल्लंघन केले गेले असून, कर्जाचे पैसे त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या कंपन्यांकडे वर्ग करण्यात आले असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. तसेच या कंपन्यांपैकी, ज्यांना कर्ज वाटप झाले त्यापैकी अनेक कंपन्या केवळ कागदावरच आहेत. त्यामुळे देशमुख यांनी किती बँकांकडून किती कर्ज घेतले होते, त्याची रक्कम किती होती, याचा ईडी तपास करीत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments