R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राजीव गांधींनंतर संघटनात्मक पातळीवर काँग्रेस पक्ष कमी पडला - नाना पटोले

राजीव गांधींनंतर संघटनात्मक पातळीवर काँग्रेस पक्ष कमी पडला – नाना पटोले

 

काँग्रेस प्रदेशध्यक्ष नाना पटोले हे केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका अनेकवेळा दिसून आले आहेत. तसेच आपल्या स्पष्ट आणि रोकठोक मतांसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाना पटोले यांनी राजीव गांधींनंतर संघटनात्मक पातळीवर काँग्रेस पक्ष कमी पडल्याचं मत व्यक्त केलं आहे. इतकच नाही तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसचा अपप्रचार केल्यामुळे निवडून आल्याचा टोलाही लगावला आहे.

एबीपी माझाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना पटोले यांनी गल्लीपासून ते दिल्लीतील राजकारणावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेतृत्वाबद्दल बोलताना, “राजीव गांधींनंतर संघटनात्मक पातळीवर आम्ही कमी पडलो. काँग्रेसकडे सध्या राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं नेतृत्व असून त्यांनी जीएसटी, नोटबंदी आणि करोना काळातील संकटावर आधीच इशारा दिला होता,” असं मत व्यक्त केलं आहे.

तसेच पुढे बोलताना पटोले यांनी, “काँग्रेसच्या कालावधीमध्ये झालेल्या देशाच्या विकासाचा अपप्रचार करण्यात आला. या अपप्रचाराला लोकं बळी पडले आणि त्यामुळेच देशाला चुकीचे नेतृत्व मिळालं आहे. त्याचा परिणाम आता लोकांना भोगावा लागतोय असं म्हणत तेहते पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्रि मोदी यांच्यावर निशाणा साधला होता.

आरोग्य व्यवस्था अजून मजबूत आणि सर्वांनाच मोफत व चांगला उपचार मिळावा अशी आमची विचारसणी आहे, असंही पटोले म्हणाले. महाराष्ट्रामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार क्षेत्रात काम करण्याचा आमचा विचार आहे. इंग्रज देश लुटून गेले तर आम्ही रडत बसलो नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक धोरणांच्या आधारे काम करताना श्रीमंतांकडून कर घेऊन गरिबांचाही विकास करण्याचं धोरण काँग्रेसने स्वीकारलं, असं पटोले म्हणाले

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments