R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या विवाहबाह्य संबंधाच्या आरोपानंतर मनसे काय भूमिका घेणार, गजानन काळेंवर कारवाई होणार?

विवाहबाह्य संबंधाच्या आरोपानंतर मनसे काय भूमिका घेणार, गजानन काळेंवर कारवाई होणार?

मुंबई | मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्यावर पत्नीने विवाहबाह्य संबंध तसेच जातीवाचक शिवीगाळीचे आरोप केला आहे. तशी तक्रारच काळे यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात केली आहे. त्यामुळे काळे अडचणीत आले असून त्यांच्यावर मनसेकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गजानन काळे हे मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष आहेत. त्यांनी बेलापूर विधानसभेची निवडणूकही लढवली होती. शहरात त्यांचा दबदबा आहे. मात्र, पत्नीने केलेल्या आरोपामुळे काळे अडचणीत सापडले आहेत. या घटनेमुळे मनसेत खळबळ उडाली आहे.

या घटनेवर अद्याप मनसेचे पदाधिकारी बोलायला तयार नाहीत. पदाधिकाऱ्यांनी मौन साधल्याने काळे यांच्यावर मनसेकडून कारवाई होणार की नाही यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत. काळे यांच्या पत्नीने त्यांच्यांवर तक्रार केली आहे. त्यामुळे हा काळे कुटुंबीयांचा घरगुती वाद आहे. त्यामुळे त्यावर बोलणं उचित ठरणार नाही, असं मनसेचे पदाधिकारी सांगतात.

मात्र, असं असलं तरी या प्रकरणात आणखीही वेगळ्या गोष्टी पुढे आल्याने पक्षाने त्याची गंभीर दखल घेतली पाहिजे, असाही एक सूर मनसेतून उमटत असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे मनसेप्रमुख या प्रकरणावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments