R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शेतकऱ्याच महाबीज शासनाने सोडल वाऱ्यावर व्यवस्थापकीय संचालक नेमण्याकरिता व सुधारणाकरिता आंदोलन

शेतकऱ्याच महाबीज शासनाने सोडल वाऱ्यावर व्यवस्थापकीय संचालक नेमण्याकरिता व सुधारणाकरिता आंदोलन

 

शेतकऱ्यांच महामंडळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र बियाणे महामंडळ महाराष्ट्राच्या महा विकास आघाडीच्या शासनाने वाऱ्यावर सोडले आहे. गेल्या २ वर्षापासून पूर्ण वेळ महा व्यवस्थापकीय संचालक नसल्यामुळे महाबीजचे काम ठपकाळले आहे. व त्याचा ठपका बीज उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. आणि म्हणून महाबीजमध्ये पूर्ण वेळ संचालक नेमण्याकरिता महाबीज पूर्वीसारखे सक्षम चालण्याकरिता ७ दिवसाच्या आत निर्णय न घेतल्यास शेतकऱ्यांसोबत माजी कृषिमंत्री डॉ.अनिल बोंडे अकोला येथील महाबीज कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार आहे.

शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक बियाणे मिळावे म्हणून शेतकऱ्यांना महामंडळ बीज उत्पादनाकरिता निर्माण करण्यात लाले होते. गेल्या २ वर्षाच्या अगोदर महाबीजद्वारे गुणवत्तापूर्वक सोयाबीन, चना, तूर कांदा बियाणे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बाजारामधून उपलब्ध होत होती. महाबीज हे शासनाचा उपक्रम असला तरी सातत्याने नफ्यात राहत होते. या महाबीजच्या द्वारे विदर्भातील ६४ तालुक्यामध्ये अनेक शेतकरी, उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे गट बीज उत्पादन करित होत्या. त्यामुळे बीज उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना खात्रीचे उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत होते. सोयाबीनच्या बियाणाकरिता बाजारपेठेमधील ५०% ते ६५% पर्यंतचा वाटा महाबीजचा होता. परंतु यावर्षी १६ लाख क्विंटल पैकी १.५ लाख क्विंटल बियाणे महाबीज कडून पुरविल्या गेले व सर्व शेतकऱ्यांना खाजगी कंपन्या कडून बियाणे घ्यावे लागले. त्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक व लुट मोठ्या प्रमणात झाली. तीच परिस्थिती उन्हाळी भुईमुग, उडीद, मुंग, तूर, चना, कांदा बियाणे या संदर्भात महाबीजचे कमी उत्पादन गेल्या २ वर्षात झालेले आहे.

महाबीजच्या या अधोगतीला संपूर्णतः महाविकास आघाडीच उध्दव ठाकरे सरकार जबाबदार आहे. कारण २ वर्षापासून पूर्ण वेळ त्या व्यवस्थापकीय संचालक नाही त्यामुळे बियाणे खरेदी व विक्रीबाबत ठोस निर्णय होत नाही. शेतकरी व शेतकरी कंपन्यांना देण्यात येणारा बीज उत्पादनाचा कार्यक्रम ३०% कमी करण्यात आला आहे. कमी कर्मचारी विद्यापिठातून संशोधित ब्रीडर बियाणाची वानवा (कमतरता) इत्यादी करणे बीज उत्पादनाचा कार्यक्रम कमी करण्याकरिता दाखविण्यात आलेला आहे.

महाबीज ने बीज उत्पादनाचा कार्यक्रम कमी करून खाजगी कंपनीला मोकळे करून दिलेले आहे. या २ वर्षाच्या काळात महाबीजचे भागीदार असलेल्या शेतकऱ्यांची प्रत्यक्ष तर नाहीच परंतु आभासी सभा सुद्धा घेण्यात आली नाही. भागधारकांना लाभांश सुद्धा देण्यात आलेला नाही. आणि शेतकऱ्यांना महाबीजच बियाण ज्याची विश्वासार्यता जास्त असते आणि किंमत कमी असते ते सुद्धा उपलब्ध झाले नाही.

त्यामुळे महाबीजला जाणीवपूर्वक कमकुवत करून महाविकास आघाडी सरकारने बीज उत्पादक कंपनी, सोयाबीन, उडीद, मुंग, तूर, चना, कांदा पिकवणारे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान करून खाजगी कंपन्यांचा फायदा करून दिलेला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments