R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की, राष्ट्रपतींनी केंद्राला विचारणा करायला हवी होती - नवाब...

संसदेत महिला सदस्यांना धक्काबुक्की, राष्ट्रपतींनी केंद्राला विचारणा करायला हवी होती – नवाब मलिक

 

मुंबई | संसदेत विरोधकांनी विविध मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. यावरून निर्माण झालेल्या गदारोळाला थोपवण्यासाठी संसदेत मार्शलला बोलावण्यात आले होते. त्यात महिला सदस्यांना पुरुष मार्शलकडून धक्काबुक्की करण्यात आली. त्यावर राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांनी याबाबत केंद्राला विचारणा करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार मद्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. संसदेत महिला सदस्यांसोबत पुरुष मार्शलने धक्काबुक्की केली. बळाचा वापर करण्यात आला. ही घटना अशोभनीय आहे. महिला सदस्यांचा अपमान करण्यात आला. तसेच मार्शलला बोलावून सत्ताधाऱ्यांना एकप्रकारे विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला होता.

देशात लोकसभाई असताना लोकशाहीत अशाप्रकारची घटना योग्य नाही. यावर लोकसभा अध्यक्ष व राष्ट्रपतींनी चिंता व्यक्त केली. परंतु त्यांनी सरळ- सरळ केंद्रसरकारला याप्रकरणी विचारणा करण्याची गरज होती. मात्र त्यांनी राजकीय दबावामुळे तसे केले नसावे, अशी शंकाही नवाब मलिक यांनी उपस्थित केली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments