R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे झंजावाती नियोजन! दौऱ्याचे प्रमुख प्रमोद जठार यांच्या आढावा...

राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे झंजावाती नियोजन! दौऱ्याचे प्रमुख प्रमोद जठार यांच्या आढावा बैठकांची जोरदार सुरुवात!

भारतीय जनता पक्षाच्या “जन आशीर्वाद यात्रे” बद्दल लोकांमध्ये प्रचंड औत्सुक्याचे वातावरण आहे. आपण प्रधानमंत्री नव्हे तर प्रधान सेवक आहोत आणि या देशाचा कारभार लोकाभिमुख असावा ही मा.नरेंद्र मोदी यांची नेहमीच भूमिका राहिली आहे. याच संकल्पनेतून देशभरातील जनतेचा आशीर्वाद घ्या म्हणून आपल्या मंत्र्यांना सांगणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.

याच पार्श्वभूमीवर कोकणचे नेतृत्व नारायणराव राणे यांची जन आशीर्वाद यात्रा दिनांक १९ ते २६ ऑगस्ट या काळात मुंबईपासून ते सिंधुदुर्गपर्यंत निघत आहे. या झुंजार आणि अभ्यासू नेतृत्वाला मिळालेले केंद्रीय मंत्रीपद, रोजगाराच्या क्षेत्रात कोकणच्या बेरोजगारांना उभे करू शकण्याची क्षमता असणारे मध्यम, लघु व सुक्ष्म उद्योग मंत्रालय आणि कोकणातील सध्याची राजकीय स्थिती पाहता ही यात्रा प्रचंड जोशात आणि उत्साहात होणार हे निश्चित. या यात्रेच्या नियोजनाचे प्रमुख ही जबाबदारी पक्षाने महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोदजी जठार यांच्यावर सोपवली आहे.

या बैठकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून दिनांक १२ ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता माणगाव रायगड येथून सुरुवात होणार आहे. दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष महेशजी मोहिते, आमदार नितेशजी राणे आणि मा. निलेशजी राणे यांच्यासह नियोजनाची ही बैठक होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता चिपळूण येथे उत्तर रत्नागिरी विभागाची आढावा बैठक मा. प्रमोदजी जठार यांच्यासह जिल्हाध्यक्ष मा. विनयजी नातू, आमदार नितेशजी राणे व प्रदेश सचिव निलेशजी राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

१३ ऑगस्ट रोजी रत्नागिरी येथे आढावा बैठक जिल्हाध्यक्ष मा. दीपकजी पटवर्धन यांच्यासह होत आहे. मा.प्रमोदजी जठार, निलेशजी राणे व आमदार नितेशजी राणे या बैठकीत संगमेश्वर ते राजापूर या क्षेत्रातील यात्रेचा नियोजनात्मक आढावा घेणार आहेत.

दिनांक १४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सिंधुदुर्ग जिल्ह्याची आढावा बैठक प्रहार भवन, कणकवली येथे होणार आहे. यात्रेचे प्रमुख प्रमोद जठार, आमदार नितेश राणे, जिल्हाध्यक्ष तेली, प्रदेश सदस्य अतुलजी काळसेकर, माजी आमदार अजितराव गोगटे यांच्यासमवेत यात्रेच्या नियोजनाची चर्चा या बैठकीत होईल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात या दौऱ्याचा समारोप होत असून राणे यांचे स्वागत शानदार व यादगार होईल असे नियोजन करण्यात येईल.

१६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता वसंत स्मृती दादर येथे मुंबईची आढावा बैठक होत आहे. सुनील राणे हे नारायणराव राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे सहप्रमुख असून मुंबईतील यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मुंबईतल्या या आढावा बैठकीला कार्यक्रम प्रमुख प्रमोद जठार यांच्यासह प्रदेश सचिव निलेशजी राणे, आमदार नितेशजी राणे, आमदार सुनीलजी राणे हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जन आशीर्वाद यात्रा १९ व २० ऑगस्ट रोजी मुंबई तसेच २१ ऑगस्ट रोजी वसई विरार येथे असणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments