R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुख्यमंत्र्यांच्या कोरोना नियमांना डावलत युवा सेनेकडून धडाकेबाज कार्यक्रम |

मुख्यमंत्र्यांच्या कोरोना नियमांना डावलत युवा सेनेकडून धडाकेबाज कार्यक्रम |

 

बीड | बीडमध्ये शिवसेना प्रणित युवासेनेचे संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं . जिथं आजवर कोरोनाचे निर्बंध अद्याप कडक आहेत, अशा बीडमध्ये शिवसेनेनेच कोरोनाचे नियम धाब्यावर बसवल्याने चित्र दिसून येत होते.

तर दुसरीकडे यशवंतराव चव्हाण नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी नसतांना नाट्यगृहातचं शिवसेनेकडून धडाकेबाज कार्यक्रम घेण्यात आला .या संवाद दौऱ्याला हजारो युवा सैनिकांची उपस्थिती लावली होती
या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत, मास्क न लावता हजर राहिल्यामुळे कोरोना बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोरोनाचे नियम फक्त सर्वसामान्य नागरिकांनाचं आहेत का? असा प्रश्न निर्माण होत आहे. सत्ताधारी शिवसेनेला नियम नाहीत का ?

युवासेना सचिव वरून सरदेसाई मराठवाड्याच्या संवाद दौर्‍यावर आहेत. गुरुवारी त्यांचा दौरा बीडमध्ये होता, दरम्यान यावेळी सरदेसाई यांनी सेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. एकीकडे राज्य सरकारकडून नाट्यगृह, सिनेमागृह, धार्मिक स्थळ आणि सामूहिक कार्यक्रमास बंदी असताना मात्र, युवा सेनेकडून शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कोरोना नियमांचा फज्जा उडवत संवाद दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली होती.

या कार्यक्रमासंदर्भात सचिव वरून सर्देसाई यांना विचारले असता हाच नियम पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मोदींना का लावला नाही तो लावला असता तर दुसरी लाट आली नसती, निवडक कार्यकर्ते घेऊन हा मेळावा होत आहे असं ते म्हणाले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments