R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शरीरसुखाची मागणी करणारे संजय राठोड आले मीडियासमोर

शरीरसुखाची मागणी करणारे संजय राठोड आले मीडियासमोर

 

शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याने राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

या पत्रकार परिषदेत राठोड म्हणाले की, संस्थेत नोकरी मिळावी म्हणून माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आले आहेत. या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही. सध्या या संस्थेशीही माझा संबंध नाही. केवळ वैफल्यातून हे आरोप करण्यात आले आहेत. माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असा दावा संजय राठोड यांनी केला आहे.

संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच या प्रकरणाची संपूर्ण माहितीही पत्रकार परिषदेत दिली. राजकारणात विरोध आणि स्पर्धा न करता खोटे आरोप केले जात आहेत. राजकारण संपण्याचा प्रयत्न होत आहे. राजकारणात आपली मोठी रेष न ओढता, दुसऱ्याची रेष छोटी करतात.
राजकारणात पाय ओढण्याचा संपवण्याचा प्रयत्न होत आहे.

मीडिया आणि सोशल मीडियात स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे ब्रेकिंग न्यूजसाठी शहानिशा न करता खोटी बातमी दिली जात आहे. अशा बातम्यामुळे एखाद्याचं करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. काल एका पत्राचा आधार घेऊन माझ्यावर आरोप करण्यात आले. ही स्पर्धा जीवघेणी ठरू नये. माध्यमांनी प्रकरण समजून घ्यावं. माझा राजकीय प्रवास संपवण्याचा प्रकार आहे, असं राठोड म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments