R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा प्रयत्न हाणून पाडू- उदय सामंत

रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराचा प्रयत्न हाणून पाडू- उदय सामंत

 

पुणे | पत्रकारितेसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटचा मुद्दा राज्यात चांगलाच तापला आहे. रानडे इन्स्टिट्यूट ही पत्रकारितेचं शिक्षण देणारी देशातील महत्वाची आणि नावाजलेली संस्था आहे. त्यामुळे रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराबाबत अनेकांनी विरोध दर्शवल्यानंतर आता राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनीही रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

रानडे इन्स्टिट्यूट दुसरीकडे स्थलांतरीत करून तेथील जागा कुण्या बिल्डरला देण्याचा प्रयत्न होत असेल तर तो प्रयत्न मी एक मंत्री म्हणून हाणून पाडेल, असं उदय सामंत यांनी बीडमधील पत्रकार परिषदत बोलताना सांगितलं आहे.
फर्गसन कॉलेज रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूटच्या जागेची आजच्या बाजारभावानूसार किंमत ४०० कोटी इतकी असल्याचं सांगितलं जात आहे.

तासकच रानडे इन्स्टिट्यूट स्थलांतर करून ती जागा एका बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा खळबळजनक आरोप विद्यार्थी कृती समितीने केला आहे. त्यामुळे या वादाला आता वेगळंच वळण मिळालं आहे.
उदय सामंत यांनी बीडमधील पत्रकार परीषेदत विविध विषयांचा आढावा घेतला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांनाही योग्य त्या सूचना सामंत यांनी दिल्या. रानडे इन्स्टिट्यूट स्थलांराबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर मी उद्या (शनिवार) रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments