R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पीडित महिलेची तक्रार हा राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का? चित्रा वाघ

पीडित महिलेची तक्रार हा राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का? चित्रा वाघ

 

माझ्यावरील करण्यात आलेले आरोप चुकीचे असून मीडिया खात्री न करता या बातम्या चालवत आहेत, असं विधान शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी केलं होतं. राठोड यांनी पत्रकार परिषेद घेऊन आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले होते.

मात्र राठोड यांच्या या भूमिकेवर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. पीडीत महिलेची तक्रारही राठोडांना टीआरपीचा विषय वाटतो का? हा सत्तेचा माज नाही तर काय आहे? असा सवाल करतानाच मुख्यमंत्र्यांना रक्षाबंधन निमित्त राख्या पाठवल्या जाणार आहेत, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन राठोड यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. यवतमाळ येथील तरुणीने गंभीर आरोप केले आहेत. पोलीस अधिक्षकांकडे या महिलेने पोस्टाने तक्रार केली आहे. शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांच्यावर हे आरोप करण्यात आले आहेत. यवतमाळच्या एसपींनीही तक्रार आल्याचं मान्य केलं आहे. पण महिलेची तक्रार येऊनही तिचा अजून जबाब नोंदवण्यात आला नाही. तिला कोणी विचारणाही केली नाही.

पीडित महिलेने संजय राठोड यांनी पतीला नोकरीवर कायम ठेवण्यासाठी शरीरसुखाची मागणी करत शारीरिक, मानसिक छळ केल्याचे तक्रारीत म्हटलंय. तर माजी मंत्र्याला अशा न्यूज म्हणजे टीआरपीची न्यूज वाटते. राठोड यांचं विधान धक्कादायक आहे. ही कसली मग्रुरी आहे. हा सत्तेचा माज आहे, असं वाघ म्हणाल्या.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments