R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मराठी माणसाच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण असायला हवेत. त्या विचाराने मार्मिकचा जन्म झाला...

मराठी माणसाच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण असायला हवेत. त्या विचाराने मार्मिकचा जन्म झाला – उद्धव ठाकरे

मुंबई | मार्मिकच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला.
‘मार्मिक साप्ताहिकाला आणि मला ६० वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यातही आमच्यातील एक साम्य म्हणजे मार्मिकने आणि मी महाराष्ट्राला नवं रुप दाखवलं. मार्मिक नव्या रुपात येतोय आणि मी सुद्धा जनतेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री झालो’, असं भाष्य करत मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मार्मिकच्या इतिहासावर प्रकाशझोत टाकला.

शिवसेनेचं मुखपत्र आणि प्रसिद्ध व्यंगचित्र साप्ताहिक मार्मिकचा वर्धापन दिन शुक्रवारी साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे संवाद साधला. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर फेसबुकच्या माध्यमातून याचे प्रक्षेपण दवणण्यात आले होते.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘आता भाषण करण्याची सवय मोडली आहे. दोन वर्षापासून कोरोनाचं शुक्लकाष्ठ मागे लागलं आहे, त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने साजरा करावा लागत आहे. मार्मिकबद्दल एक सादरीकरण केलं गेलं. हे बघताना मला प्रमोद नवलकरांची आठवण आली. मार्मिकच्या वाटचाली शिवसैनिकांचा मोठा वाटा आहे,’ असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

‘काळ नेहमी आव्हानात्मक असतो. तेव्हाही होता आणि आताही तसाच आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मावळा या नावाने व्यंगचित्र काढायचे. हा लढा महाराष्ट्राने यशस्वी केला. मुंबई मिळवली. मराठी माणसाला आळशी म्हटलं जातं, पण लढण्यासाठी मराठी माणसानेच हिंमत दाखवली.
मराठी माणसाच्या आयुष्यात विरंगुळ्याचे क्षण असायला हवेत. त्या विचाराने मार्मिकचा जन्म झाला’, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. ‘मराठी माणसावर परप्रांतीय आक्रमण करताना दिसत होते. यातूनच एक संघटना जन्माला आली, तिचं नाव शिवसेना. या व्यंगचित्रातून ही चळवळ उभी राहिली. बाळासाहेबांनी व्यंगचित्रांच्या जोरावर एक संघटना उभी केली,’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

नवाब मलिकांचे एनसीबीच्या महासंचालकांना पत्र, वानखडे विरोधात केली ही मागणी

  मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज सकाळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्या अटक व एनसीबी अधिकारी...

Recent Comments