R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति 'मी जबाबदारीतून पळणारा नाही' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

‘मी जबाबदारीतून पळणारा नाही’ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला

 

मुंबई | माझी ही बदललेली जबाबदारी तुम्ही पाहत आहात. ही जबाबदारी तुमच्यामुळे माझ्याकडे आली आहे आणि मी या जबाबदारीतून पळणारा नाहीये असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. आज मार्मिक वर्धापन दिन सोहळा मुंबईत पार पडत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शिवसैनिकांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्यातून साकारलेले “मार्मिक” व्यंगचित्र साप्ताहिक आज ६१ वर्ष पुर्ण करतं आहे. शिवसेना पक्षाच्या प्रवासात “मार्मिक” व्यंगचित्र साप्ताहिक शिवसेनेच्या स्थापनेचा पाया होता. आज “मार्मिक” चा होत असलेल्या ६१ व्या वर्धापन दिनाला शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी यावेळी संवाद साधला.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मार्मिक आणि माझे वय सारखेच आहे. आता या वयात मार्मिक ही बदलतोय. तशीच माझी ही बदललेली जबाबदारी तुम्ही पहाताय. ही जबाबदारी तुमच्यामुळे माझ्याकडे आलीय आणि मी जबाबदारीतून पळणारा नाहीये असं यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. संकटाच्या छाताडावर चालून जा. ते खरे शौर्य आहे. आता रडायचं नाही लढायचंय. ही प्रेरणा आपल्याला मार्मिकने दिली असंही मुख्यमंत्री म्हणाले.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

क्रांती रेडकरने मौलानांचे दावे फेटाळले, ही माहिती आधी द्यायला हवी होती

  मुंबई | समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे मौलाना मुजम्मिल अहमद यांनी समीर मुस्लिम असल्याचा दावा केला. या वृत्तामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यावर...

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

Recent Comments