R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home देश 'युवर टाईम स्टार्टस नाऊ' या खासदाराने दिले थेट मोदींना आव्हान |

‘युवर टाईम स्टार्टस नाऊ’ या खासदाराने दिले थेट मोदींना आव्हान |

 

नवी दिल्ली | राज्यसभेतील गोंधळांच्या संबंधात तृणमुल कॉंग्रेसचे डेरेक ओब्रियन यांनी काल सरकारला आठ प्रश्‍न विचारणारा व्हिडीओ प्रसारीत केला होता. त्यातच आज पुन्हा आणखी एक व्हिडीओ जारी करून थेट पंतप्रधान मोदींनाच सवाल उपस्थित केला आहे. राज्यसभेत घटना दुरूस्ती विधेयके सादर करण्यात आलेली असतानाही मोदी सभागृहात का उपस्थित राहिले नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. या आधीचे पंतप्रधान अशा वेळी आवर्जून उपस्थित राहात असत असा दाखलाही त्यांनी दिला आहे.

त्यांनी म्हटले आहे की सरकारच्या मंत्र्यांना मी काल आठ प्रश्‍न विचारले होते, त्यापैकी एकाचेही उत्तर आले नाही. याचे मला काहीच आश्‍चर्य वाटले नाही कारण त्यांच्याकडे याची उत्तरे नाहीत याची मला कल्पना होती. त्यामुळे आता मला तुमच्या बॉसलाच प्रश्‍न विचारायचा आहे असे नमूद करीत ओब्रियन यांनी मोदींना उद्देशून सवाल उपस्थित केले.

तत्कालिन पंतप्रधान मनमोहनसिंग आणि देवेगौडा हे राज्यसभेतील घटना दुरूस्ती विधेयकाच्यावेळी राज्यसभेत उपस्थित राहिले होते व त्यांनी चर्चेत भाग घेतला होता. मग तुम्ही संसदेतून गायब का झालात असा प्रश्‍न त्यांनी मोदींना विचारला आहे. तुम्ही संसद अधिवेशनाला दांडी का मारता? पंतप्रधान तुम्ही कोठे आहात? असे प्रश्‍न त्यांनी मोदींना विचारले आहेत. तुम्ही संसदेची चेष्टा चालवली आहे असेही ओब्रियन यांनी मोदींना सुनावले आहे. तुम्ही आणि तुमचे सरकार संसदेला आणि लोकांना उत्तरदायी आहात.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतं, काँग्रेसची जळजळीत टीका

  सध्या कर्नाटकात पोट निवडणुकीच्या जोरदार प्रचार सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. मात्र आता या पोट निवडणुकीच्या...

” देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये.” केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.

  राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा...

केंद्रात मंत्री असूनही नारायण राणे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान नाही

  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून आपली नवी टीम जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments