R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राज्याच्या गृह खात्याची अवस्था म्हणजे 'आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय -...

राज्याच्या गृह खात्याची अवस्था म्हणजे ‘आंधळं दळतंय अन् कुत्र पीठ खातंय – चित्रा वाघ

 

मुंबई | सध्या राज्यात शिवसेना नेते आणि माजी वनमंत्री संजय राठोड यांच्या आणखी एका प्रकरणाच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार आणि गृहखात्याच्या कारभारावर ताशोरे ओढले आहेत. ते आज पुण्यात पत्रकार परिदेत बोलताना त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

राज्याच्या गृह खात्याची अवस्था म्हणजे आंधळ दळतंय अन् कुत्र पीठ खातंय अशी झाली आहे. महाविकास आघाडीतील सत्ताधारी तीन पक्ष केवळ एकमेकांची पाठ थोपण्यात मग्न असल्याचा घणाघाती टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केला आहे.

वाघ म्हणाल्या, लैंगिक शोषणाचा आरोप करणाऱ्या महिलेच्या तक्रारीस माजी मंत्री संजय राठोड यांनी टीआरपी न्यूजसाठी असे आरोप केले जात असल्याचे सांगून सत्तेचा माजच दाखविला आहे. मात्र, या प्रकरणात सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत भाजप सर्वस्तरावर लढा देणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

तसेच राज्य सरकार जरी मुर्दाड असले तरी आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याने पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी उच्च न्यायालयात पीआयएल दाखल केली आहे. याविषयी यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षकांशी माझे बोलणे झाले असल्याचे सांगून संबंधित पीडित महिलेचे राठोड यांच्याविरोधात तक्रारपत्र आल्याचे त्यांनीही सांगितले आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २४ तासांच्या आत यावर कार्यवाही होणे अपेक्षित असताना, या पत्राची अद्यापही दखल घेतली गेलेली नाही.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

Recent Comments