R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया उच्च न्यायालयाप्रमाणे राज्यपाल देखील संविधानाच्या लक्ष्मण रेषेचं पालन करतील

उच्च न्यायालयाप्रमाणे राज्यपाल देखील संविधानाच्या लक्ष्मण रेषेचं पालन करतील

 

राज्यपाल भगत सिंह कोसयारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानपरिषदेतील १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्तीबाबतच्या वादावरून चांगलेच वाजलेले दिसून आले होते. आता हा वाद कोर्टात असून काल त्यावरील सुनावणी झाली असता, कोर्टाने या संदर्भातील याचिका निकाली काढली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विटरवरून राज्यपालांला खडेबोल सुनावले आहे.

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यपालांना आदेश देता येणार नाही, मात्र त्यांना मंत्रिमंडळाचा प्रस्ताव अनिश्चित काळासाठी प्रलंबितही ठेवता येणार नसल्याचं उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. संविधानाने आखून दिलेल्या लक्ष्मण रेषेचं पालन उच्च न्यायालयाप्रमाणे आता महामहीम राज्यपाल महोदयही करतील, असा विश्वास आहे, असे म्हणत त्यांनी राज्यपालांवर निशाना साधला आहे.

“राज्यपाल या जागा दीर्घकाळासाठी रिक्त ठेवू शकत नाहीत. त्यांच्या अधिकारांच्याबाबतीत आम्ही काही निरीक्षणे केली आहेत. विशिष्ट कारणांसाठी ही पदे रिक्त ठेवली गेली असतील, तर त्यांची कारणीमिमांसा गरजेची आहे”, असं हायकोर्टाने नमूद केलं आहे. मुख्यमंत्री-राज्यपाल यांच्यात समन्वय हवा. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला हवं. मात्र ते कुणालाही उत्तर देण्यास बांधिल नाहीत. त्यामुळे याबाबतीत कोर्टही त्यांना निर्देश देऊ शकत नाही,” असं त्यांनी नमूद केलं आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments