R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति बैलगाडा शर्यत आंदोलनात आमदार पडळकर यांची उडी, २० ऑगस्ट रोजी भव्य बैलगाडा...

बैलगाडा शर्यत आंदोलनात आमदार पडळकर यांची उडी, २० ऑगस्ट रोजी भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन

 

 

सांगली | राज्यात बैलगाडा शर्यतीचा मुद्धा चांगलाच गाजत असून  दुसरीकडे कर्नाटक आणि तामिळनाडूच्या धर्तीवर बैलगाडा शर्यतीला शासनाने तात्काळ परवानगी द्यावी, या मागणीसाठी राज्यभर शेतकरी संघटनेसह विविध पक्षीय कार्यकर्ते व शेतकरी आंदोलन करीत आहेत, त्या आंदोलनात आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर  यांनी उडी घेतली असून त्यांनी थेट स्वतःच्या गावात भव्य बैलगाडा शर्यतीचेच आयोजन केले आहे.

 

आजवर अनेक गावांत यात्रे दरम्यान मोठ्या प्रमाणात बैलगाडा शर्यती होत असतात मात्र, बंदी असल्याने या होत नाहीयेत. त्यामुळे बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्याची मागणी बैलगाडा मालक आणि चालक यांच्याकडून वारंवार होताना दिसत आहे. आमदार पडळकर यांनी त्यांच्या सांगली जिल्ह्यातील झरे येथे भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे. दि.२० ऑगस्ट २०२१ रोजी झरे येथे भव्य दिव्य छकडा गाडी शर्यत मैदान आयोजित केले आहे.

 

महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांनो मोठ्या संख्येने सहभागी व्हा. असे आवाहन पडळकर यांनी केलं आहे. मैदान हे विना काठी, विना लाठी होईल, पंचांचा निर्णय अंतिम राहिल, मैदान सकाळी ठिक ७ वा. चालू होईल, मैदान १००% होणारच, मैदान हे आपल्या पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरेनुसार होईल अश्या सूचना ही प्रसिद्ध केल्या आहेत, तर १ लाख ११ हजार पासून २२ हजार रुपयांपर्यंत बक्षिसही जाहीर केलं आहे. मात्र कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आमदार पडळकर यांच्यावर काय कारवाई करते हे पाहावे लागणार आहे

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

मेळावे घेण्यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..? – शालिनीताई ठाकरे यांचा टोला !

  राज्य महिला आयोगाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अध्यक्षपदाचा चाकणकरांनी गुरुवारी पदभार स्वीकारला होता. त्यावर मनसे नेत्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments