R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 14 ऑगस्ट हा दिवस 'विभाजन विभाषिका स्मृती दिवस' म्हणून पळाला जाईल -...

14 ऑगस्ट हा दिवस ‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ म्हणून पळाला जाईल – नरेंद्र मोदी

 

नवी दिल्ली | 14 ऑगस्ट याच दिवशी 1947 साली भारताची फाळणी होऊन पाकिस्तान या नव्या राष्ट्राची निर्मिती झाली. भारताच्या फाळणीचा इतिहास रक्तरंजित आहे. या फाळणीमध्ये हजारो लोकं मारली गेली, तसंच लाखो जणांना आपलं घर-दार सोडून अंगावरच्या कपड्यासह स्थलांतर व्हावं लागलं. फाळणीच्या या जुन्या आठवणीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भावुक झाले आहेत.

पंतप्रधानांनी ट्विट करत 14 ऑगस्ट हा दिवस फाळणीच्या वेदनांचं स्मरण करण्यासाठी ‘विभाजन विभाषिका स्मृती दिवस’ म्हणून पाळला जाईल, अशी घोषणा केली आहे. या कृतीमुळे देशातील भेदभावाचे विष कमी होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी म्हंटले आहे की, ‘देशाच्या फाळणीची वेदना विसरणे अशक्य आहे. द्वेष आणि हिंसा या कारणामुळे आपल्या लाखो भावंडांना विस्थापित व्हावं लागलं. अनेकांनी जीव गमावला.

त्यांचा संघर्ष आणि आठवण म्हणून १४ ऑगस्ट हा दिवस विभाजन विभाषिका स्मृती दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दिवस आपल्याला भेदभाव, वैमनस्य, आणि दुर्भावना याचे विष संपवण्यासाठी प्रेरणा देईल. त्याचबरोबर एकता, सामजिक सलोखा आणि मानवी संवेदना देखील यामुळे मजबूत होईल असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments