R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति "पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा"

“पुढचा स्वातंत्र्यदिन भयमुक्त, कोरोनामुक्त साजरु करु, असा सगळ्यांनी निश्चय करावा”

 

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन जनतेला संबोधित करणार आहेत. या कार्यक्रमाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या नीरज चोप्रासहित इतर ३२ खेळाडूंना विशेष आमंत्रित करण्यात आलं आहे. आजच्या लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमावर भारतीय वायुदलाच्या वतीनं पुष्पवृष्टी करण्यात आली आहे.

देश आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणार आहे. या कार्यक्रमाचा सोहळा आज विशष पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजघाटवर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीला श्रद्धांजली वाहतील. त्यानंतर सकाळी ७.१८ मिनीटांनी ते लाल किल्ल्याच्या लाहोरी गेट वर पोहोचतील.

लाल किल्ल्यावरील या कार्यक्रमासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनलर बिपिन रावत, संरक्षण सचिव अजय कुमार आणि लष्कराच्या तीनही दलाचे प्रमुख उपस्थित असतील.
त्यानंतर पंतप्रधानांना लष्कराच्या तीनही दलांकडून मानवंदना देण्यात येणार आहे.

या दरम्यान, दिल्ली पोलिसांची एक तुकडीही या कार्यक्रमात उपस्थित असणार आहे. या मानवंदनेनंतर पंतप्रधान लाल किल्ल्यावर पोहोचतील आणि तिरंगा फडकावतील. यावेळी राष्ट्रगीताची धुन वाजवण्याची जबाबदारी इंटर-सर्व्हिस ब्रॅन्डकडे असेल.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments