R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राजसाहेब, गजानन काळेंची मनसेतून तात्काळ हकालपट्टी करा, तृप्ती देसाईंची मागणी |

राजसाहेब, गजानन काळेंची मनसेतून तात्काळ हकालपट्टी करा, तृप्ती देसाईंची मागणी |

 

मुंबई | मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांनी पतीविरोधात मानसिक आणि शारीरिक छळासह विवाहबाह्य संबंधांचा आरोप केला आहे. या आरोपणानंतर गजानन काळे यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होत होते. त्यातच आता गजानन काळेंची नवी मुंबई मनसे शहराध्यक्षपद आणि मनसेतून हकालपट्टी करावी अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केली आहे.

“गजानन श्रीकृष्ण काळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नीने नवी मुंबई पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मात्र दोन दिवस झाले आरोपीला अटक झालेली नाही. त्यानंतर संजीवनी काळे यांना पोलीस सांगतात की तुम्ही एफआयआर मागे घ्या किंवा सेटलमेंट करा, तडजोड करा. एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर महिलेला न्याय देण्याचं काम पोलिसांचं असतं, सेटलमेंट करण्याचं नाही.” असं तृप्ती देसाई यांनी बोलून दाखविले होते.

“राज्यामध्ये गृहमंत्री काय करत आहेत, एखादी महिला अन्याय झाल्यानंतर वाचा फोडते, गुन्हा दाखल करते, त्या आरोपीला पहिलं अटक करा ना, तातडीने गजानन काळेंना अटक झाली पाहिजे. ते मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांना माझी विनंती आहे, आपण महिलांच्या सन्मानासाठी काम करता, परंतु गजानन काळेंनी ज्या पद्धतीने शारीरिक, मानसिक त्रास संजीवनी काळेंना दिला आहे. त्यावर मनसेची कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, हे दुर्दैव आहे. त्यामुळे आपण तातडीने आपण मनसेच्या सर्व पदावरून हकालपट्टी करावी, अशी भूमाता ब्रिगेडची मागणी आहे असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

नाशिक महानगर पालिका जिंकण्यासाठी संजय राऊतांची मोर्चेबांधणी सुरु

  नाशिक | नाशिक मनगर पालिका निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऑर्डर तयारी सुरु केली आहे तसेच इतर सर्वच राजकीय...

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

Recent Comments