R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा

मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा

 

कोरोनामुळे मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे आर्थिक संकट यंदा दूर होण्याची चिन्हे आहेत. मंडळांच्या मागणीनंतर अखेर मुंबई महानगरपालिकेने यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना व्यावसायिक जाहिराती स्वीकारण्याची मुभा दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे. यासंदर्भात नवे जाहिरात निकष मुंबई महानगरपालिकेने जाहीर केले असून मुंबईतील नवरात्रोत्सव मंडळांनादेखील हे निकष लावले जाणार आहेत.

मुंबईत दरवर्षी मोठय़ा उत्साहात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो; परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत गेल्या वर्षीपासून अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याची वेळ मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर आली. नियमांच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करताना जाहिरातीविना साजरा करावा लागला होता.

त्यातच अनेक गणेशोत्सव मंडळांवर तर त्यांच्या मुदत ठेवी मोडण्याची वेळ आली होती. याची गंभीर दखल घेत बृहृन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने मुंबई महानगरपालिकेकडे व्यावसायिक जाहिरातीला परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती.

याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या निकषानुसार सार्वजनिक मंडळांना जाहिरातीला परवानगी देताना मंडपाच्या प्रवेशद्वारापासून १०० मीटर अंतरापर्यंत व्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करण्यासाठी प्रति प्रवेशद्वार १०० रुपये तर १०० मीटर अंतराबाहेर एका प्रवेशद्वारावर १००० रुपये आकारण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या, भाजपच्या या नेत्यानं साधला निशाणा

  खासदार मोहन डेलकर यांच्यानंतर शिवसेनेकडून दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीकरिता मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा नगर- हवेली...

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव ‘दाऊद?? मालिकांनी दिला आणखी एक पुरावा

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने...

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

Recent Comments