R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न

शेतकऱ्याचा मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न

 

मुंबई | एकीकडे सर्व देशभरात ७५ वा स्वतंत्र दिन साजरा होत असताना दुसरीकडे जळगावच्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतल्यानं पुढील अनर्थ टळला. सध्या या शेतकऱ्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर काही वेळाने हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली. या शेतकऱ्यानं असं का केलं याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सदर शेतकऱ्याला तात्काळ जावळीत रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

ध्वजारोहनावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, अजूनही कोरोनाचं संकट घोंघावतंय. आपण कोरोनाचा कहर अनुभवलाय. आरोग्य सुविधा आपण वाढवतोय. आता आपण शिथीलता देत असताना ऑक्सिजनचा पुरवठा ठरवून आपण शिथिलता देत आहोत. ज्यावेळी असं लक्षात येईल, की ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतोय, त्यावेळी आपल्याला नाईलाजाने लॉकडाऊन लावावं लागेल, असं म्हणाले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

मेळावे घेण्यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..? – शालिनीताई ठाकरे यांचा टोला !

  राज्य महिला आयोगाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अध्यक्षपदाचा चाकणकरांनी गुरुवारी पदभार स्वीकारला होता. त्यावर मनसे नेत्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments