R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति ठाणे-पडघा रस्ता आठपदरी करा अनिल भालेराव यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना...

ठाणे-पडघा रस्ता आठपदरी करा अनिल भालेराव यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

 

नाशिक- मुंबई- आग्रा महामार्गावरील ठाणे ते पडघा हा रस्ता आठपदरी करावा,अशी मागणी करणारे निवेदन नाशिक भाजपा मा.उपाध्यक्ष अनिल भालेराव यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना दिल्ली भेटीच्यावेळी प्रत्यक्ष सादर केले.

मुंबई-आग्रा महामार्गावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते.मुंबईहून नाशिकला जातांना ठाण्याच्या उड्डाणपुलावर अहमदाबाद,सुरतकडून नाशिक,पुणे,मुंबईच्या दिशेने येणारी सर्व वाहने घोडबंदर रोडने येतात आणि तेथे वाहतुकीची प्रचंड कोंडी होते.तेथून पुढे नाशिककडे जाणारा रस्ता चारपदरी आहे.परंतु अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांची होणारी गर्दी पुढे नाशिक ते धुळे आणि जळगाव ते नागपूरपर्यंत उर्वरित महाराष्ट्र किंवा बाहेरच्या राज्यातील रस्त्याने मुंबईकडे जाणारी बहुतांश खासगी वाहने याच मार्गाने ये जा करतात.त्यामुळे प्रचंड वाहतूक असते,

त्यात एखादे वाहन नादुरुस्त झाल्यास रस्त्यावर वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागणे हे तर नित्याचेच झाले आहे.मुंबई-आग्रा महामार्गावर 35 वर्षांपूर्वी ठाणे ते भिवंडी हा रस्ता चौपदरी झाला.परंतु तोच रस्ता सद्या या महामार्गाचा बॉटलनेक झाला आहे.त्यामुळे वाहतुकीची होणारी कोंडी रोखण्यासाठी तसेच अपघात टाळण्यासाठी ठाणे ते पडघा टोल नाक्यापर्यत चा महामार्ग आठपदरी होणे ही काळाची गरज आहे त्यामुळे या प्रश्नांत तातडीने लक्ष घालण्याची विनंतीही निवेदनात करण्यात आली आहे.

आपल्या प्रयत्नांमुळे मुबई-आग्रा महामार्गावरील कल्याणफाटा आणि अंजूरफाटा येथे उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलांमुळे तेथील वाहतुकीची कोंडी दूर झाली आहे याची आठवण करून देतांना नाशकात के.के.वाघ अभियांत्रिकी कॉलेज ते हॉटेल जत्रापर्यंत पूल उभारून नाशकातील वाहतूक समस्या दूर केल्याबद्दल भालेराव यांनी ना.गडकरी यांचे निवेदनात शेवटी आभार मानले आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments