R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया अमेरिकेनं आम्हाला धोका दिला, अफगाणी लोकांचे व्हाईट हाऊस बाहेर राष्ट्राध्यक्ष जो बायडन...

अमेरिकेनं आम्हाला धोका दिला, अफगाणी लोकांचे व्हाईट हाऊस बाहेर राष्ट्राध्यक्ष जो बायडन विरोधात निदर्शनं

 

तालिबाननं अफगाणिस्तानवर रविवारी कब्जा मिळवल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तसेच तालिबान आणि अफगाणिस्तानच्या चर्चेनं आता जोर पकडला आहे. काही लोकांनी हा अमेरिकेचा पराभव असल्याचंही म्हटलं आहे.

याचदरम्यान, सोमवारी काही अफगाणी नागरिकांनी अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शने केली. तसंच त्यांनी बायडेन प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीला बायडेन प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केला.

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या सैन्याला माघारी बोलावणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तालिबाननंही पुन्हा सक्रिय होण्यास सुरूवात केली होती. अमेरिकन लष्कर जसं मागे परतू लागलं तसं अवघ्या काही कालावधीत तालिबाननं अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा केला. रविवारी तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments