R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति शिखर बँक घोटाळ्यात थोरल्या आणि धाकट्या पवारांचाही हात - शालिनी पाटील

शिखर बँक घोटाळ्यात थोरल्या आणि धाकट्या पवारांचाही हात – शालिनी पाटील

 

सातारा | जरंडेश्वर साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांकडून काढून घेण्याचे पाप करणारे राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत. न्यायालयाच्या आदेशानुसार सभासद शेतकऱ्यांच्या ताब्यात देण्यासाठीच ईडीने जरंडेश्वर साखर कारखाना ताब्यात घेतल्याचे जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा माजी मंत्री डॉ. शालिनीताई पाटील यांनी येथे झालेल्या कारखान्याच्या वार्षिक सभेत बोलताना सांगितले.

यावेळी बोलताना शालिनीताईं पाटील यांनी शरद पाव नाद अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. कारखान्याचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी ईडीने योग्य तो निर्णय घ्यावा, यासह नऊ ठराव या सभेत झाले. शिखर बँकेच्या गैरव्यवहारात थोरल्या आणि धाकट्या पवारांचा हात आहे, असा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला.

पुढे शालिनीताई पाटील म्हणाल्या कि, शिखर बँकेच्या गैरव्यवहाराची पुन्हा चौकशी सुरू झाली तर राष्ट्रवादीच्या मंडळींना घरामध्ये तोंड लपवून बसण्याची वेळ येईल. सभासद शेतकऱ्यांकडून कारखाना काढून घेण्याचे पाप करणारे राष्ट्रवादीचे नेते रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाहीत, असा तळतळाट त्यांनी व्यक्त केला.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments