R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या राष्ट्रवादीच्या बैठकीला भाजपच्या नगराध्यक्षाची हजेरी, राजकीय वर्तुळात चर्चा |

राष्ट्रवादीच्या बैठकीला भाजपच्या नगराध्यक्षाची हजेरी, राजकीय वर्तुळात चर्चा |

 

एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देऊन राष्ट्र्वादीत प्रवेश केला होता. त्यामुळे जळगावात भाजपाला जोरदार धक्का बसला होता. आता त्या पाठोपाठ जळगावात भाजपमध्ये गळती सुरु झाली आहे. आता खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या आढावा बैठकीला थेट भाजपच्या नगराध्यक्षाने सहकाऱ्यांसह हजेरी लावल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. aon)

सावदा येथील पालिकेतील सत्ताधारी व विरोधक यांच्यात आज मनोमिलन घडून आले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपचे सत्ताधारी नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी तसेच विरोधक हे एकत्र आले होते. यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे बदलणाची चिन्हे दिसत आहेत.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याचा फटका भाजपला बसणार हे निश्चित असल्याचे मानले जात आहे. खडसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राजेश वानखेडे आणि पंकज येवले व त्यांचे सहकारी यांच्यात मनोमिलन व पक्षप्रवेश घडवून आणणे यासाठीच ही आढावा बैठक आयोजित करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. सावदामध्ये भाजपची सत्ता आहे. परंतु भाजपचे नगराध्यक्ष हे खडसेचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे आता पुन्हा एकदा भाजपला सावदामध्ये शह देण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments