R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति भाजपच्या करंटेपणामुळे पुण्याला लस नाही मिळाली, काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी साधला...

भाजपच्या करंटेपणामुळे पुण्याला लस नाही मिळाली, काँग्रेस नेते मोहन जोशी यांनी साधला मोदी सरकारवर निशाणा |

 

पुणे | कोविशिल्ड लसीचे जादा डोस पुण्याला देण्याची सीरम इन्स्टिट्यूटची अजूनही तयारी आहे, पण भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या करंटेपणामुळे जादा डोसला मुकावे लागत आहे, असा मोहन जोशी यांनी केला. पुण्याला कोविशिल्डचे जादा डोस देण्याची तयारी आहे, असे सीरमचे संस्थापक सायरस पूनावाला यांनी लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारताना सांगितले. फक्‍त याकरिता केंद्र सरकारच्या परवानगीची गरज आहे. पूनावाला यांची तरी ऐकून भाजपचे स्थानिक नेते हलतील का? असा सवाल मोहन जोशी यांनी केला आहे.

सीरम इन्स्टिट्यूटचे आदर पूनावाला यांनी महापौरांना पत्र पाठविले आणि केंद्र सरकारची परवानगी घ्यावी, असे सुचविले. याला प्रतिसाद न देता महापौरांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना भेटू, अशी उडवाउडवीची उत्तरे दिली. लसीकरणाचे महत्त्व ओळखा आणि सीरमचे जादा डोस मिळवा, असे आवाहन मी केले होते, भाजप नेते याबाबत गंभीर दिसत नाहीत, असे जोशी म्हणाले.

सध्या संपूर्ण राज्यात युद्ध पातळीवर लसीकरण मोहीम केंद्र आणि राज्य सरकारतर्फे राबवले जात आहे मात्र अद्यापही अनेक जिल्यांमध्ये आणि शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. तसेच पुण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी पुण्यातील लसीच्या तुटवड्यासाठी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

इंधन दरवाढीवर आंदोलन करणारा भाजप आता गप्प का ?

  मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाच्या संसर्गामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे आज बेरोजगारीमुळे उपासमारीची वेळ आलेली असताना त्यात दुसरीकडे वाढत्या इंधनदरवाढीमुळे सामान्य व्यक्ती हतबल झाला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments