R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना तीन महिने कारावासाची शिक्षा

 

अमरावती | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांना ३ महिने कारावास व दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आमदार भुयार यांना अमरावती जिल्हा न्यायालयाने २०१३ मधील प्रशासकीय अधिकाऱ्याला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार २०१३ मध्ये वरुड तहसील कार्यालयाच्या सभागृहात सुवर्ण जयंती राजस्व अभियानाची यशोगाथा तयार करत असताना वाद झाला होता. आमदार भुयार यांच्यासह काही लोकांनी सभागृहात येऊन घटनेच्या दिवशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शासकीय ज्वारी खरेदी केंद्र उशिरापर्यंत का बंद आहे? असा प्रश्न उपस्थित केला.

तसेच माझा फोन का कट केला? असं म्हणत आमदार देवेंद्र भुयार यांनी तत्कालीन तहसीलदार राम लंके यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत माईक फेकून मारला. याबाबत उपजिल्हाधिकारी राम लंके यांनी पोलीस स्थानकात २७ फेब्रुवारी २०१३ रोजी तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणी गुन्हा सिद्ध होऊन आमदार भुयार यांना कलम ३५३ अन्वये तीन महिने सक्तमजुरी आणि १५ हजार रुपये दंड न भरल्यास एक महिना कारावास तसंच कलम २९४ अन्वये दोन महिने सक्तमजुरी आणि १० हजार रुपयांचा दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments