R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'पेगॅसस'प्रकरणी आता केंद्र सरकार करणार चौकशी

‘पेगॅसस’प्रकरणी आता केंद्र सरकार करणार चौकशी

 

नवी दिल्ली |  देशात फोन टँपिंग प्रकरण चांगलेच गाजत असून याच मुद्द्यावरून विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारला घेरले होते. तसेच याच मुद्द्यावरून विरोधकांनी संसदेचे कामकाज सुद्धा बंद पडले होते. याच पार्श्वभूमीवर कथित हेरगिरी प्रकरणाची न्यायालयीन आणि ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणार्‍या एकूण नऊ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी केंद्र सरकारने न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात म्हटले की, केंद्रीय दूरसंचार आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हेरगिरीच्या आरोपांविषयी संसदेमध्ये सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

मात्र, काही लोकांद्वारे आपल्या स्वार्थासाठी पसरविण्यात येणारा खोटेपणा उघडकीस आणणे आणि निर्माण झालेल्या मुद्द्यांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकार तज्ज्ञांची समिती नेमणार असून ही समिती या प्रकरणाच्या सर्व पैलूंची सविस्तर चौकशी करेल.

त्याचप्रमाणे ‘पेगॅसस’ हेरगिरी आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्याची विनंती करणार्‍या याचिका या अटकळी, अनुमान आणि प्रसारमाध्यमांमध्ये प्रकाशित अस्पष्ट बातम्यांवर आधारित असल्याचेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments