R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "दादा, तुमचं जेवढं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द"

“दादा, तुमचं जेवढं वय, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द”

 

पुणे | राज्यपाल यांचं वय झालं आणि शरद पवार साहेब यांचं वय झालं नाही का?, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करत थेट शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टीका केली होती. आता या टीकेला राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टोला लगावला आहे.

रुपाली चाकणकर यांनी एक व्हिडीओ ट्विट करून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. वयोमानामुळे राज्यपालांना लक्षात राहत नसावं म्हणून सदस्यांच्या नियुक्त्या रखडल्या असाव्यात असं शरद पवारांनी म्हटलं होतं. पवार बोलल्यानंतर चंद्रकांत पाटील राज्यपालांच्या मदतीला धावून गेले.

पहिली गोष्ट राज्यपाल हे भाजपचे पदाधिकारी नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू घेण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरी गोष्टी चंद्रकांतदादा तुमचं जितकं वय आहे, तेवढी पवारांची संसदीय कारकिर्द आहे. हे कोथरूड व्हाया आमदार झालेल्या दादांनी लक्षात घ्यावं, असा टोला चाकणकर यांनी लगावला.

पुढे त्या म्हणाल्या की, दादा, तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात. चार दिवस दिल्लीत थांबूनही अमित शहा यांनी तुम्हाला भेट नाकारली. याचं जरा आत्मचिंतन करा. तेव्हाच कुणाच्या वयाचा काय मुद्दा आणि साहेबांवर काय बोलावं याचं तुम्हाला भान येईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

 

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments