R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अभिनेता रितेश देशमुखने शेअर केले आपल्या नव्या प्रोजेक्टचे फोटो

अभिनेता रितेश देशमुखने शेअर केले आपल्या नव्या प्रोजेक्टचे फोटो

 

मुंबई | अभिनेता रितेश देशमुख नव्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाला आहे. लवकरच तो डिजिटल माध्यमात पदार्पण करणार आहे. तो OTT प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी उत्सुक झाला असून शशांक घोष दिग्दर्शित चित्रपटात रितेश दिसणार आहे. या चित्रपटातील रितेश देशमुखचा फर्स्ट लूक लॉंच करण्यात आला आहे.

अभिनेता रितेश देशमुखने सोशल मीडिया इन्स्टाग्राम अकाउंटवर आगामी चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो मुंबईतल्या एका कुटूंब न्यायालयाच्या आवारात उभा असून त्यांच्या बॅगवर नुकतेच घटस्फोटीत आणि सुखी असे लिहिलेली एक पाटी त्याने हातात पकडलेली दिसते आहे.

तसेच त्याने शेअर केलेल्या आणखी दुसऱ्या फोटोत त्याच्यासमोर अभिनेत्री तमन्ना भाटिया दिसून येते. त्यामुळे या चित्रपटाच्या कहाणीबाबत प्रेक्षकांना मोठी उत्सुकता आहे. ‘प्लॅन ए प्लॅन बी’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे. याची कथा एका मॅचमेकर आणि घटस्फोटीत वकीलावर आधारीत आहे.

रितेश देशमुख आणि तमन्ना भाटिया व्यतिरिक्त अभिनेत्री पूनम ढिल्लन आणि कुशा कपिला देखील या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. ‘प्लॅन ए प्लॅन बी’ या चित्रपटाविषयी दिग्दर्शक शशांक घोष म्हणाले, नेटफ्लिक्ससह प्लॅन ए प्लॅन बीची घोषणा करताना मी खूप उत्साहित आहे. ही एक अनोखी कथा आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments