R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति "महावीस आघाडी सरकारचे पुण्यातील एक काम दाखवा आणि ३० हजारांचं बक्षीस मिळवा"

“महावीस आघाडी सरकारचे पुण्यातील एक काम दाखवा आणि ३० हजारांचं बक्षीस मिळवा”

 

पुणे | महाविकास आघाडीचे पुण्यातील एखादे काम दाखवा आणि ३० हजार रुपयांची रक्कम मिळवा, अशी ऑफर भारतीय जनता पक्षाकडून देण्यात आली आहे. भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया स्पर्धेला प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असताना मोठ्या प्रमाणात विकासकामे झाल्याचा दावा पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे.

राज्यात महविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पुन्हा शहराच्या विकासाला खीळ बसली आहे, असा आरोप मुळीक यांनी केला. सोशल मीडियावरील स्पर्धेमुळे भाजप आणि राष्ट्रवादीत सध्या कलगीतुरा रंगला आहे. गेल्या साडेचार वर्षात पुणे मनपात भाजपाची सत्ता आहे, त्यामुळे शहरात अनेक चांगले निर्णय घेत, विकासकामे केली.

तसंच मागील पाच वर्षात जेव्हा भाजपची सत्ता होती, त्यावेळी पुण्यात अनेक विकासकामं झाली. त्याआधी १५ वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता मनपामध्ये होती, तेव्हा त्यांनी पुण्यात कोणती कामं केली ते सांगावं. उगाच भाजपला विरोध करायचा, नागरिकांमध्ये अफवा पसरावायचं काम राष्ट्रवादीकडून सुरु आहे.

भाजपने मेट्रोला मान्यता दिली, मेट्रोचं काम 24 तास सुरु आहे. शहराच्या दृष्टीने पाणीपुरवठा प्रकल्प सुरु झाला, त्याचं अर्धे काम झालं आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी बस खरेदी, दहा रुपयात प्रवास करता येतो, अशा चांगल्या सेवा सुरु केल्या.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

निवडणूकीला जो बायडन घेऊन या; संजय राऊतांचा भाजपला टोला

  दादरा नगर हवेलीत होणाऱ्या पोटनिवडणुकीत शिवसेनेने कंबर कसली असून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. या पोट निवडणुकीच्या निमित्ताने अनेक...

“प्रशांत किशोरांनी पक्षात प्रवेश करावा मग ज्ञान पाजळावे” काँग्रेसच्या या नेत्याचा सल्ला

  नवी दिल्ली | राजकारणातील चाणक्य म्हणून प्रसिद्ध असलेले प्रशांत किशोर सध्या चांगलेच चर्चेत आलेले दिसून येत आहे. किशोर यांच्या काँग्रेसमधील प्रवेशाबाबत अद्याप काही माहिती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments