R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर रुग्णालयात

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर रुग्णालयात

 

शिक्षकांचे सुधारित वेतन काढण्याची परवानगी देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारलेल्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांचा मुक्काम अद्यापही जिल्हा रुग्णालयातच आहे. मंगळवारी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनाविल्यानंतर त्यांच्या वकिलांतर्फे तत्काळ जामीन अर्ज दाखल करण्यात आला.

मात्र, तपासात झनकर पोलिसांना सहकार्य करीत नसल्याने न्यायालयाने तो फेटाळला. सायंकाळी पुन्हा प्रकृती अस्वस्थेचे कारण पुढे केल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आठ दिवसांपूर्वी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषद कार्यालयात सापळा रचून थेट शिक्षण विभागाच्या कार्यालयातून शिक्षणाधिकारी झनकरांसह प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते आणि शासकीय वाहनचालक ज्ञानेश्वर येवले यांना ताब्यात घेतले.

मध्यरात्रीपर्यंत चौकशी व झडती सुरू राहिले. परंतु, बुधवारी सकाळी झनकर फरार झाल्याचे लक्षात आले. दशपुते आणि येवले यांना दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी झनकर यांना नाशिकमधून पोलिसांनी ताब्यात घेतले.

परंतु त्यांना अटक केल्यानंतर प्रकृती अस्वस्थ असल्याचे सांगत सोमवारपर्यंत रुग्णालयात दाखल झाल्या. सोमवारी पुन्हा एक दिवसीय कोठडी मिळाल्याने मंगळवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले गेले. परंतु, झनकर या सातत्याने रुग्णालयात असून, माहिती देण्यात सहकार्य करीत नसल्याची बाजू सरकारी वकिलांनी मांडली. पोलिसांनी कोठडी मागितल्यानंतर झनकरांना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments