R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एकनाथ खडसेंना मोठा धक्का, आज होणार पत्नीची चौकशी होणार!

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, आज होणार पत्नीची चौकशी होणार!

 

कथित भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या अधकनी आता वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता ईडीने एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. याआधी समन्स देऊनही खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे चौकशीला गैरहजर राहिल्या होत्या, त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.

कथित भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मंदाकिनी खडसे यांना आज (१८ ऑगस्ट) ईडीने कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स दिलं आहे. मंदाकिनी खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाच्या जाळ्यात अडकवण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. याआधी एकनाथ खडसे यांचे जावाई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.

याआधी एकनाथ खडसे यांची याच भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडीने ९ तास चौकशी केली होती. आता त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे अंमलबजावणी संचालनालयाच्या रडारवर आहेत. तत्कालीन फडणवीस सरकारच्या काळात झोटींग समितीने एकनाथ खडसे यांना क्लीन चीट दिली होती.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments