R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन चंद्रकांत पाटील यांची माहिती

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भाजपातर्फे निबंध स्पर्धेचे आयोजन चंद्रकांत पाटील यांची माहिती

 

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रच्या माध्यम विभागातर्फे ‘गेल्या ७५ वर्षात देशाने काय कमावले ? काय करायचे बाकी आहे ?’ या विषयावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली असून पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पंचाहत्तर हजार, पन्नास हजार व पंचवीस हजार रुपयांची पारितोषिके देण्यात येतील तसेच स्पर्धेतील निवडक निबंधांचे संकलन करून एक ग्रंथ प्रकाशित करण्यात येईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपला देश १५ ऑगस्ट २०२१ रोजी स्वातंत्र्याची ७४ वर्षे पूर्ण करून अमृत महोत्सवी ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. गेल्या ७४ वर्षात देशाने अनेक क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. त्याचबरोबर करण्यासारखे बरेच काही राहून गेले आहे. अनेक संधींचा लाभ घेतला तर अनेक संधी गमावल्या.

देशाची अर्थव्यवस्था, शेती, सिंचन, शिक्षण, संरक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा, सामाजिक सुधारणा अशा अनेक बाबतीत देशाची प्रगती झाली आहे पण त्याचबरोबर अनेक कामे करणे अद्यापही बाकी आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या सर्वाचा आढावा घेण्याची वेळ आली आहे. देशासंबंधीच्या महत्त्वाच्या विषयावर अमृतमंथन घडविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे.

त्यांनी सांगितले की, स्पर्धेसाठीचे निबंध चार हजार ते पाच हजार शब्दांचे असावेत, त्यामधील नोंदींच्या संदर्भांचा स्पष्ट उल्लेख असावा आणि निबंध संशोधनपर असावेत अशी अपेक्षा आहे. या निबंध स्पर्धेच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांनी विविध विषयांवर व्यापक वाचन करावे आणि काही निश्चित विश्लेषणात्मक भूमिकेतून लेखन करावे, अशी अपेक्षा आहे.

स्पर्धेसाठीचे निबंध bjpessaycompetition@gmail.com या २५ नोव्हेंबरपर्यंत ई मेलने पाठवावेत. विविध क्षेत्राशी संबंधित २५ विषयांची यादी निश्चित केली असून त्या पैकी कोणत्याही एका विषयावर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी या भाषेत निबंध लिहावा. प्रत्येक भाषेसाठी स्वतंत्रपणे पारितोषिकांची व्यवस्था केली आहे. विषयांची यादी आणि स्पर्धेची नियमावली प्रदेश भाजपाच्या मनोगत या ॲपवर उपलब्ध आहे. गुगल प्लेस्टोअरवरून हे ॲप डाऊनलोड करून घेता येईल. हे ॲप https://bit.ly/3fhfYRp या लिंकवरही उपलब्ध आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

…पुन्हा एकदा किरीट सोमय्या यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर गंभीर आरोप !

  राज्यात आघाडीसह सरकार स्थापन झाल्यापासून महाविकास आघाडीच्या अनेक मंत्र्यांवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचे आरोप लगावले होते.तसेच त्यांच्या आरोपणानंतर अनेकांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी...

जनतेने नापास केले तरी तुम्ही सत्तेत, फडणीवसांचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला

  मुंबई | मुंबईत झालेल्या दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख यांनी विरोधी पक्षावर तसेच सत्तेत असलेल्या मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला होता. याला...

कोल्हापुरात शाही दसरा उत्साहात संपन्न, अनेक मान्यवरांनी लावली उपस्थितीत

  कोल्हापुर | कोल्हापुरातील करवीरनगरीत पारंपरिक विजयादशमीचा सण ऐतिहासिक दसरा चौकात शाही थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments