R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति राष्ट्रवादीमुळेच म्हस्के बिनविरोध महापौर झाले; हे त्यांनी विसरु नये, आनंद परांजपे यांनी...

राष्ट्रवादीमुळेच म्हस्के बिनविरोध महापौर झाले; हे त्यांनी विसरु नये, आनंद परांजपे यांनी लगावला टोला

 

ठाणे | राष्ट्रवादी काँग्रेसची आम्हाला गरज नाही, असे महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे. आता त्यांच्या या विधानाचा राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. परांजपे हे विसरले आहेत की राष्ट्रवादीमुळेच ते बिनविरोध महापौर झाले आहेत. त्यांना आता याची आठवण नसेलच; म्हणून आम्ही ती आठवण करुन देत आहोत, असा टोला आनंद परांजपे यांनी लगावला.

मंगळवारी महासभा सुरु असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर नरेश म्हस्के यांनी आपणाला राष्ट्रवादीची गरज नाही, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला होता. त्यामुळे ठाणे मनपात शिवसेना नि राष्ट्रवादी समोरासमोर विरोधात उभी असलेली दिसून येत आहे

आनंद परांजपे यांनी सांगितले की, विस्मृती ही देवाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के! ज्या वेळी महापौरपदाची निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेचे नेते, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांना फोन करुन शिवसेनेचा महापौर बिनविरोध व्हावा, अशी विनंती केली होती.

या विनंतीनंतर १७ नोव्हेंबर २०१९ रोजी एकनाथ शिंदे आणि उमेदवार म्हणून नरेेश म्हस्के हे तत्कालीन विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनात आले. त्यावेळी आपणांसह गटनेते नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकदेखील उपस्थित होते. त्यावेळी शिंदे आणि म्हस्के यांनी, “राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे; त्यामुळे ठाण्यातही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध करावी”, अशी विनंती केली.

तसेच शिंदे यांच्या विनंतीनंतर राष्ट्रवादीने निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेला महापौरपद बिनविरोध पद्धतीने दिले. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१९ रोजी नरेश म्हस्के हे महापौर झाले. म्हणूनच आपण, विस्मृती ही देवाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे, असे म्हणत असून नरेश म्हस्के हे १७ नोव्हेंबर २०१९ ची घटना विसरले असतील. म्हणून मी त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ही आठवण करुन देतो.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

मेळावे घेण्यापलीकडे रुपालीताईंनी महिलांसाठी केलंय तरी काय..? – शालिनीताई ठाकरे यांचा टोला !

  राज्य महिला आयोगाला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या अध्यक्षपदाचा चाकणकरांनी गुरुवारी पदभार स्वीकारला होता. त्यावर मनसे नेत्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments