R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या महागाईचा विळखा घट्ट होतोय, सामान्यांचा श्वास गुदमरतोय, त्याची पर्वा कोणाला आहे का?,

महागाईचा विळखा घट्ट होतोय, सामान्यांचा श्वास गुदमरतोय, त्याची पर्वा कोणाला आहे का?,

 

मुंबई | खासदार संजय राऊत हे स राजकारणातील स्पष्ट वक्ते म्हणून ओळखले जातात. त्यातच कोरोना संसर्ग आणि बदलत्या महागाईवरून त्यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. देशाची बिघडलेली अर्थव्यवस्था आणि सतत होणारी महागाई याबाबत प्रश्न अनेक असले तरी त्याचे उत्तर एकच आहे, पण ते देणे केंद्र सरकारला राजकीयदृष्ट्या सोयीचे नाही. आधीच कोरोना आणि लॉक डाऊनचा मार; त्यात दरवाढीचा भडीमार अशा ‘चक्रव्यूहा’त देशातील सामान्य जनता सध्या फसली आहे, असं म्हणत आजच्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.

 

कोरोना प्रादुर्भावाचे प्रमाण आपल्या देशात कमी होत असले तरी महागाईचे प्रमाण मात्र कमी होण्याची चिन्हे नाहीत. उलट दिवसेंदिवस ती वाढतच आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरांनी शंभरी पार केली आहेच, आता विनाअनुदानित घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. सोमवार मध्यरात्रीपासूनच ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. त्यामुळे १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत मुंबईत ८५९.५० रुपये एवढी असेल. काही शहरांमध्ये हीच किंमत ८९७ रुपयांपर्यंत वाढली आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमतही 68 रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे त्या प्रकारातील 19 किलोचे एलपीजी सिलिंडर आता 1618 रुपयांना मिळेल. म्हणजे घरगुती गॅसही महाग आणि व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग झाल्याने विकत घ्यायच्या खाद्यपदार्थांच्या किमतीतही वाढ होणार, असा दुहेरी मार सामान्य माणसाला खावा लागणार आहे.

अर्थात, हे काही नवीन नाही. या वर्षाच्या सुरुवातीपासूनच हा पेट्रोल-डिझेल आणि गॅस दरवाढीचा सिलसिला सुरु आहे. घरगुती गॅसच्या सिलिंडरची किंमत जानेवारी २०२१ मध्ये ६९४ रुपये होती. फेब्रुवारीमध्ये ती ७१९ रुपये झाली. मार्च महिन्यात ती ८१९ रुपये, तर आता थेट ८५९.५० रुपये एवढी झाली आहे. म्हणजे या वर्षभरात घरगुती गॅसचे एक सिलिंडर तब्बल १६५ रुपयांनी महाग झाले आहे. पुन्हा या महागाईबद्दल सरकारकडे बोट दाखवायचीही सोय नाही. कारण सरकार लगेच पेट्रोलियम कंपन्या आणि तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींकडे बोट दाखवून हात झटकते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments