R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजपाच्या नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्र्यांचा शिवसेनेकडून सत्कार

भाजपाच्या नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्र्यांचा शिवसेनेकडून सत्कार

ठाणे | नवनिर्वाचित चार केंद्रीय मंत्र्याची सध्या जन आशीर्वाद यात्रा सुरु आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागांत-शहरांत अनेक केंद्रीय मंत्री जात आहेत, तेथील जनतेशी संवाद साधत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा बुधवारी बदलापूरमध्ये आली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी भाजपच्या मंचावर जाऊन त्यांचं स्वागत केल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे.

कपिल पाटील हे भिवंडी लोकसभेचे खासदार असून बदलापूर शहर हे भिवंडी लोकसभेत येतं. या मतदारसंघाचे खासदार केंद्रात राज्यमंत्री झाल्यामुळे कपिल पाटील यांच्या जनआशीर्वाद यात्रेचं बदलापूर शहरात जोरदार स्वागत करण्यात आलं. त्यातच बदलापूरच्या घोरपडे चौकात भाजपनं कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी उभारलेल्या मंचावर शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कपिल पाटील यांचं स्वागत करत त्यांचा सत्कार केला.

याबाबत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे म्हणाले की, आपल्या स्थानिक खासदारांची केंद्रात मंत्री म्हणून निवड होणं, ही शहरासाठी आनंदाची बाब असून एखाद्या वरिष्ठांचं स्वागत करणं, शहरात आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं ही शिवसेनेची आणि बाळासाहेबांची शिकवण असल्याचं वामन म्हात्रे म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments