R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या .....राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्राप्रमुख प्रमोद जठारांचा खासदार विनायक राऊतांना टोला

…..राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर यात्राप्रमुख प्रमोद जठारांचा खासदार विनायक राऊतांना टोला

 

स्वातंत्र्यवीर सावरकर, लो.टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वर्गीय अटलजी, स्व.बाळासाहेब ठाकरे आदी विभूती या कोणा एकाची खाजगी मालकी नसते तर तो राष्ट्राचा जाज्वल्य वारसा असतो. यांच्या स्मृती स्थळांचा वारसा देशातीलच काय तर जगातील कोणीही घेऊ शकतो. शिवसेनेचे युवा नेतृत्व आदित्य ठाकरे यांनीही अशीच भावना व्यक्त केली आहे. वयाने छोटे असले तरी आदित्य ठाकरेंपासून तुम्ही हे शिकण्यासारखे आहे असा टोला राऊत यांना जठार यांनी लगावला आहे

विनायक राऊत साहेब! छोट्या आदित्य ठाकरेंकडून मोठ्या दिलाची अक्कल शिका. उगाच मनाचा कोतेपणा दाखवून स्व.बाळासाहेबांची उंची कमी करू नका. छोटे दिल से कोई बडा नही होता, एवढं लक्षात घेऊन वाटचाल करा, मग तुमच्याही खासदारकीचा महाराष्ट्राच्या विकासाला फायदा होईल असा सल्ला नारायणराव राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचे प्रमुख आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री प्रमोद जठार यांनी खासदार विनायक राऊतांना दिला आहे.

स्व.बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रपुरुष आहेत, हिंदूहृदयसम्राट आहेत. त्यांचे स्मारक हे “शिवतीर्थ” आहे आणि कोणीही त्याचे दर्शन घेऊ शकतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागून आता तुमची मनं कोती आणि छोटी झाली आहेत. राजकारणात मतभेद असतातच. जसे ते राज ठाकरे आणि बाळासाहेबांमध्ये होते, नारायणराव राणे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये होते. पण यांच्यामध्ये मतभेद असले तरी मनभेद नव्हते हे आजवर अनेकदा स्पष्ट झालं आहे. असे सुद्धा जठार यांनी विनायक राऊत यांना सुनावले होते.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments