R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश तर राष्ट्रवादीच्या मंडळींना तोंड लपवून बसण्याची वेळ येईल - शालिनीताई पाटील

तर राष्ट्रवादीच्या मंडळींना तोंड लपवून बसण्याची वेळ येईल – शालिनीताई पाटील

 

सातारा | जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्व साधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत कारखान्याच्या अध्यक्षा डाॅ. शालिनीताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नऊ ठरावांना सर्वांनुमते मान्यता देण्यात आली. या सभेत शालिनीताईंनी शेतकऱ्यांना ऊसाचा चांगला दर देण्याचे जाहीर करून पुन्हा एकदा काका-पुतण्यावर जोरदार टीका केली होती.

दाेन वर्षानंतर सभेस उपस्थित राहिलेल्या शालिनीताई प्रसारमाध्यमांशी बाेलताना म्हणाल्या जरंडेश्वर सहकारी कारखाना हा न्यायालयाच्या आदेशाने ईडीने ताब्यात घेतला आहे. डिसेंबर महिन्यात गाळप सुरु करावे लागणार आहे. त्यासाठी या कारखान्याबाबत ईडीशी बाेलून काही तरी नियाेजन करणे आवश्यक हाेते. त्यासाठी सभेचे आयाेजन करण्यात आले.काेरेगाव तालुक्यात १० लक्ष टन ऊस आहे. त्याचे गाळप झाले पाहिजे. शेतक-यांना याेग्य दर दिला पाहिजे. त्यासाठी तातडीने कार्यवाही झाली पाहिजे. या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी सभा झाली. या सभेत काही महत्वपुर्ण चर्चा झाल्याचे शालिनीताई पाटील यांनी सांगितले.

दरम्यान जे राज्यात चालले आहे. त्याची दखल भारत सरकारने घ्यावी. देशाच्या सहकार खात्याने घ्यावी. प्रामुख्याने शिखर बॅंकेच्या २५ हजार काेटींच्या घाेटाळ्यात जे अपराधी ठरले आहेत. ज्यांची प्रतिमा ढागळली आहे त्यांना काेणत्याही प्रकारची निवडणुक लढविण्यास प्रतिबंध करावा हे या देशाच्या गृहमंत्र्यांच्या लक्षात आणून द्यावे यासाठी सभेची आवश्यकता हाेती. त्यानूसार आम्ही वकिलांशी चर्चा करीत आहाेत असेही त्यांनी नमूद केले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

समीर वानखेडेऐवजी दुसरा अधिकारी करणार आर्यन खान प्रकरणाचा तपास?

  मुंबई | राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखडे यांच्यावर अनेक स्वरूपाचे गंभीर आरोप लगावून एकच खळबळ उडवून दिली होती. मंत्री नवाब...

कामगारांच्या समस्या मांडून मनसे कामगार सेना कंपनीतून बाहेर पडताच शिवसेनेच्या कामगार संघटनेची कर्मचाऱ्यांना अरेरावी

  मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातील वाद आता सर्वश्रुत आहेत. त्यात येणाऱ्या मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही पक्षांमध्ये वाद होत असल्याचे चित्र...

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments