R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं, रावसाहेब दानवे यांचा अब्दुल सत्तारांना टोला

गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं, रावसाहेब दानवे यांचा अब्दुल सत्तारांना टोला

 

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघातील सत्कार सोहळ्यात विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला होता. सिल्लोडमध्ये झालेल्या सत्कार सोहळ्यात रावसाहेब दानवेंनी शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना जोरदार टोले लगावले होते.

मतदारसंघात सध्या बाबर शिरला आहे. तो नागरिकांना आमिष दाखवत आहे, असं रावसाहेब दानवे सत्तारांना उद्देशून म्हणाले. अब्दुल सत्तार खूप झालं, 50 कोटी रुपये आणील, मात्र आपण एकच रस्ता २४०० कोटींचा केला. अब्दुल सत्तार आणि माझे पैसे एकत्र करू म्हणावं, मग बघू कोण हरतं ते, असं आव्हानही दानवेंनी दिलं.

चिरीमिरीचं नाही खेळावं. गावात जातं आणि फुटाणे फेकत बसतं, शिवसेनेची शाखा काढत बसतं. मात्र या शिवसेनेच्या शाखा नाहीत, या सत्तारच्या शाखा आहेत. सत्तारला माझं चॅलेंज आहे सिल्लोड तालुक्याचा जिल्हा करून दाखवा, मी पाठीशी आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले. आता दानवे यांच्या टीकेला सत्तार काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या, भाजपच्या या नेत्यानं साधला निशाणा

  खासदार मोहन डेलकर यांच्यानंतर शिवसेनेकडून दादरा नगर- हवेली लोकसभा पोटनिवडणुकीकरिता मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दादरा नगर- हवेली...

समीर वानखेडेच्या वडिलांचे नाव ‘दाऊद?? मालिकांनी दिला आणखी एक पुरावा

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. त्यातच एनसीबीचा पंच प्रभाकर साईल याने...

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

Recent Comments