R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति नारायण राणे मुंबईत दाखल, मात्र शिवसैनिकांचा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊ न देण्याचा इशारा

नारायण राणे मुंबईत दाखल, मात्र शिवसैनिकांचा बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येऊ न देण्याचा इशारा

 

मुंबई | केंद्रीयमंत्री नारायण राणे हे दादरच्या छत्रपती शिवाजी पार्कवरील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करून जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करणार आहेत. त्यासाठी, आज मुंबईत त्यांचं आगमन झालं आहे. नारायण राणेंच्या जनआशीर्वीद यात्रेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे दिग्गज नेते सहभागी झाले आहे. मात्र दुसरीकडे शिवसैनिकांनी राणे यांना स्मुर्तीस्थळावर
जाण्यास मज्जाव केला आहे.

नारायण राणेंना बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला भेट देण्याचा नैतिक अधिकार नाही. शिवसैनिक त्यांना स्मृती स्थळावर येऊ देणार नाही, असा इशारा राऊत यांनी दिला आहे. राणेंनी आगाऊपणा केल्यास त्यांना स्मृतीस्थळापासून हाकलून दिल्याशिवाय आम्ही शिवसैनिक गप्प बसणार नाही, असा इशाराच विनायक राऊत यांनी दिला आहे.

तसेच तुमचा शिवसेनाप्रमुखांशी काय संबंध आहे? ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं, एवढं मोठं केलं, त्या बाळासाहेबांना तुम्ही दु:खी केलं. मग, आता स्मृतीस्थळाचा दर्शन घेताना तुम्हाला लाज वाटत नाही का, असेही विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाल्यास आम्ही पर्वा करणार नाहीत. राणेंना या पवित्र स्मृतीस्थळावर येऊ देणार नाही, असा इशाराच विनायक राऊत यांनी दिला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

फडणवीसांसारख्या सुसंस्कृत नेत्याचं अधःपतन बघवत नाही – संजय राऊत

  दादरा नगर-हेवली लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचाराला चांगलंच जोर धरला असूनविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आणि...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

हीन राजकारणापायी जनहिताच्या योजनांवरही बोळा फिरविण्याची ठाकरे सरकारची जनताविरोधी नीती स्पष्ट झाली

  मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी असताना राज्यात लागू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेविरुद्ध कांगावा करून शेतकऱ्यांना त्या योजनेपासून परावृत्त करण्याचा आघाडी सरकारचा डाव सपशेल...

अरविंद केजरीवालांच्या मोफत मुख्यमंत्री तीर्थ यात्रा योजनेत अयोध्येचा समावेश

  नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत परंतु कायद्यानुसार अजून आचारसंहिता लागू झालेली नाही. तोपर्यंत सर्व राजकीय पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी...

भारतीय जनता पक्षाला उल्हासनगरमध्ये मोठा धक्का तब्बल २१ नगरसेवकांनी केला राष्ट्र्वादीत प्रवेश

  उल्हासनगर मनपा निवडणुकीला काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. त्यातच शिवसेना पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुद्धा भाजपाला जोरदार...

जलयुक्त शिवारला बदनाम करणाऱ्यांचे “दात घशात गेले!” – आशिष शेलार

    जलयुक्त शिवार योजनेला बदनाम करणाऱ्या महाराष्ट्र विकास आघाडीने या योजनेची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले, अशा प्रकारचे चित्र आहे अशी प्रतिक्रिया...

Recent Comments